शेतकरी प्रश्‍नावर आजपासून उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सांगली - उपसा सिंचन योजनेसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर आज (ता. १४) पासून बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे तासगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘उपसा सिंचन योजनेतून तलाव, बंधारे भरून घ्यावेत. येरळा नदीत पाणी सोडावे, येळावी, मणेराजुरी, कवठेमहांकाळ, माधवनगर, कवलापूर नळपाणी पुरवठा योजना त्वरित सुरू कराव्यात. पाणीपुरवठ्याचे वीजबिल सरकारने भरावे. वीजबिल आकारणी शेती पंपांच्या दराने घ्यावी. स्वामीनाथन आयोग शिफारशी तत्काळ लागू कराव्यात. शेतकऱ्यांच्या मुलांना लवकर शिष्यवृत्ती मिळावी.

सांगली - उपसा सिंचन योजनेसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर आज (ता. १४) पासून बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे तासगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘उपसा सिंचन योजनेतून तलाव, बंधारे भरून घ्यावेत. येरळा नदीत पाणी सोडावे, येळावी, मणेराजुरी, कवठेमहांकाळ, माधवनगर, कवलापूर नळपाणी पुरवठा योजना त्वरित सुरू कराव्यात. पाणीपुरवठ्याचे वीजबिल सरकारने भरावे. वीजबिल आकारणी शेती पंपांच्या दराने घ्यावी. स्वामीनाथन आयोग शिफारशी तत्काळ लागू कराव्यात. शेतकऱ्यांच्या मुलांना लवकर शिष्यवृत्ती मिळावी. दुबार पेरणीसाठीचे दहा हजार रुपये विनाविलंब मिळावेत. कलाकार मानधन मिळावे, अशा मागण्या आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.’’ श्री.मोरे, शिवाजी पाटील उपस्थित होते.

Web Title: sangli news farmer