बेडगमध्ये शेतकऱ्यांचे पाण्यासाठी भर उन्हात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

मिरज - म्हैसाळ सिंचन प्रकल्पातून उपसा सुरु करावा, यासाठी शेतकऱ्यांनी आज कालव्यात बसून भजन-कीर्तन केले. बेडगमध्ये पंपगृह क्रमांक तीनजवळ तापत्या उन्हात सुमारे दोन तास कालव्यात बसून राहीले. पंधरा दिवसांत उपसा सुरु केला नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

सुमारे 34 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी महावितरणने प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला आहे. जूनमध्ये टंचाईच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्या आवर्तनाचे साडेतीन कोटींचे वीजबिलही अर्थमंत्रालयाने अद्याप मंजूर केलेले नाही. सध्या मिरज पूर्व भागातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. जिल्ह्यातील ताकारी, टेंभू योजनांचा उपसा सुरु झाला तरी म्हैसाळ योजना सुरु होण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कालव्यात बसून भजन व किर्तन केले.

एकतारी, सूरपेटी, तंबोरा, टाळ घेऊन शासनाला गाऱ्हाणे घातले.  गायनातून 'देवेंद्रा'ची आळवणी केली.  आंदोलनात पंचायत समितीतील कॉंग्रेसचे पक्षप्रतोद अनिल आमटवणे, बाळासाहेब होनमोरे, तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, दिलीप बुरसे, विष्णू पाटील, संभाजी पाटील, बाळासाहेब नलवडे, गणेश देसाई, बी, आर. पाटील आदींनी भाग घेतला. 

Web Title: Sangli News farmer agitation in Bedag