कर्जमाफी निकषात बसत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

सांगली  - कर्जमाफीतील निकषात अपात्र ठरल्यामुळे निराश होऊन कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील मनोज बापू पाटील (वय 45) या शेतकऱ्याने मंगळवारी (ता.4) नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी त्यांचा मृतदेह सापडला.

मनोज पाटील यांचे तीन एकर शेत आहे. त्यांच्यावर सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज डोक्‍यावर आहे. त्यांचे वडील बापू पाटील गेली सात वर्षे आजारी आहेत. ते अंथरुणाला खिळून असल्याने दवाखान्याचा वारेमाप खर्चही सुरू होता. परिणामी, शेतीतून येणारे उत्पन्न हाती लागत नव्हते. यंदा कर्जमाफी झाली, मात्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार जून 2016 पर्यंत थकीत असलेले कर्जच माफ होणार आहे. त्याचा धसका त्यांनी घेतला होता.

Web Title: sangli news farmer suicide