बॅंकेच्‍या कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

जत - आकळवाडी येथील संगाप्पा परप्पा मनांकलगी (वय ४५) या शेतकऱ्याने बॅंकेच्या कर्जास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत उमदी पोलिसांत नोंद झाली. 

जत - आकळवाडी येथील संगाप्पा परप्पा मनांकलगी (वय ४५) या शेतकऱ्याने बॅंकेच्या कर्जास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत उमदी पोलिसांत नोंद झाली. 

शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान संगाप्पा याने विष प्राशन केल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्याला विजापूर येथील एका बीएलडीए रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारास प्रतिसाद देत नसल्याने सायंकाळी डॉक्‍टरांनी पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात जाण्यास सांगितले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच संगाप्पा यांचे निधन झाले.

संगाप्पा यांनी आपल्या स्वत:च्या नावे असलेली शेती सुधारण्यासाठी बोर्गी बुद्रुक येथील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेतून काही वर्षांपूर्वी कर्ज काढले होते. मात्र, शेतीतील पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. त्यामुळे वसुलीसाठी संबंधित बॅंकेने न्यायालयातर्फे नोटीस पाठवली होती. त्या नोटिसीच्या धसक्‍याने त्यांनी विष पिऊन जीवन संपवल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. मात्र, अन्‍य कारणामुळे आत्महत्या केल्याची फिर्याद चुलते शरणप्पा आप्पासाब मनांकलगी यांनी दिली आहे. दरम्यान, प्रकाश वालीकर, बालगावचे उपसरपंच इराणा सारवाड, राम कांबळे, भाऊसाब मोरे यांनी कुटुंबीयाचे 
सांत्वन केले.

Web Title: Sangli News farmer suicide incidence