सांगलीवाडीत पुठ्ठा गोडाऊनला आग

विजय पाटील
सोमवार, 19 मार्च 2018

सांगली - सांगलीवाडीत पुठ्ठा गोडाऊनला शॉर्ट सर्किटमूळे भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये आसपासची आठ घरांना याचा फटका बसला आहे. 

सांगली - सांगलीवाडीत पुठ्ठा गोडाऊनला शॉर्ट सर्किटमूळे भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये आसपासची आठ घरांना याचा फटका बसला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की सकाळी दहाच्या सुमारास सांगलीवाडी येथील पुठ्ठ्याच्या गोडाऊनला आग लागली. ज्वलनशील पदार्थ अधिक असल्याने या आगीने राैद्यरुपधारण केले. आग अधिकच भडकल्याने शेजारी असणाऱ्या आठ घरांना याची मोठी झळ पोहोचली आहे. या आगीमध्ये दोन घरे जळून खाक झाली आहेत. आगीची भीषणता पाहून सांगली, तासगाव, इस्लामपूर येथील पाच ते सहा ग्निशामक गाड्याना पाचारण करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Sangli News Fire to Go down in Sangliwadi