सजावटीला "चायना मेड'ची झालर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सांगली - उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे... घरोघरी येणाऱ्या बाप्पांच्या स्वागतासाठी सारे जण जय्यत तयारीला लागले... सजावटीच्या आकर्षक साहित्याने बाजारपेठ फुलली आहे... "चायना मेड' वस्तूंची बाजारात रेलचेल दिसून येते... मूर्तींचे सौंदर्य खुलविण्यासाठी स्पर्धा व इर्षाही दिसणार आहे... 

सांगली - उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे... घरोघरी येणाऱ्या बाप्पांच्या स्वागतासाठी सारे जण जय्यत तयारीला लागले... सजावटीच्या आकर्षक साहित्याने बाजारपेठ फुलली आहे... "चायना मेड' वस्तूंची बाजारात रेलचेल दिसून येते... मूर्तींचे सौंदर्य खुलविण्यासाठी स्पर्धा व इर्षाही दिसणार आहे... 

गणेशोत्सवात सजावटीकडे अधिक कल असतो. आबालवृद्धांसह साऱ्यांची लगबग असते. अभूतपूर्व आनंदी व उत्साही वातावरण दिसते. या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ फुलली आहे. रोषणाईसाठी विजेच्या माळा, झुरमुळ्या, तोरण, तयार मखराचे प्रकार उपलब्ध आहेत. थर्माकोलची आरास, तयार मंदिरांचे तर भन्नाट प्रकार उपलब्ध झाले आहेत. 50 रुपयांपासून हजार-दोन हजारांपर्यंत किमती आहेत. 

गणपती पेठ, मारुती रोड, विश्रामबाग परिसरात ठिकठिकाणी स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. नवनवीन प्रकारच्या माळा लक्ष वेधताहेत. विविधरंगी झगमगत्या माळांना मागणी आहे. चायनीज माळा 15 पासून 500 रुपयांपर्यंत आहेत. "एलइडी'च्या भारतीय बनावटीच्या माळाही दाखल झाल्या. वॉटरप्रूफ व मल्टिपर्पज माळांच्या किमती 100 पासून 600 रुपयांपर्यंत आहेत. ड्रॉप लाइट, फिरत्या लाइटला मागणी आहे. 

पर्यावरणपूरकतेची जोड 
भक्‍तांच्या आवडीनिवडी, बदलता ट्रेंड आणि बदलत्या रूढी-परंपरेमुळे दिवसेंदिवस आवडी बदलत आहेत. यंदा पर्यावरणपूरक सजावटीवर अधिक भर आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलला फाटा देत कागदाचा लगदा, पुठ्ठा आणि सुती कापडापासून तयार केलेल्या आरासला अधिक मागणी आहे. वर्षानुवर्षे ते खराब होत नसल्याने मागणी दिसून येते. पाचशेपासून दोन हजारांपर्यंत किमती आहेत. 

पेणच्या मूर्तींची क्रेझ 
शाडूच्या मूर्तींची यंदा अधिक "क्रेझ' आहे. पेणच्या मूर्तींना अधिक मागणी असते. मूर्तीवरील कोरीव काम, रंगकामामुळे या मूर्ती अधिक देखण्या आहेत. मूर्तींची किंमत अधिक असली, तरी मागणीही तितकीच आहे. सांगलीत मारुती चौकात आपटे बंधूंनी या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

Web Title: sangli news ganesh festival Ganeshotsav

टॅग्स