करजगीत ६७ लाखांचा गांजा छापा टाकून जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

माडग्याळ - करजगी (ता. जत) येथील महेश मल्लाप्पा पट्टनशेट्टी व श्रीशेल मल्लाप्पा पट्टनशेट्टी या सख्ख्या भावांच्या अडीच एकर उसाच्या पिकातील १३५० किलो गांजाची झाडे उमदी पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. त्यांची किंमत ६७ लाख ५० हजार आहे.

माडग्याळ - करजगी (ता. जत) येथील महेश मल्लाप्पा पट्टनशेट्टी व श्रीशेल मल्लाप्पा पट्टनशेट्टी या सख्ख्या भावांच्या अडीच एकर उसाच्या पिकातील १३५० किलो गांजाची झाडे उमदी पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. त्यांची किंमत ६७ लाख ५० हजार आहे. ही कारवाई आज सकाळी अकराला केली. पोलिसांनी सात ते आठ झाडे जप्त केली. पट्टनशेट्टी बंधू पसार झाले. 

करजगीपासून पूर्वेला अडीच किलोमीटरवर महेश पट्टनशेट्टी व श्रीशेल पट्टनशेट्टी यांचे शेत आहे. शेतात उसाचे पीक आहे. या उसात दोघांनी गांजाची लागण केली आहे. गांजाची झाडे उसापेक्षाही उंच गेली आहेत. 

उमदी पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे, सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण खपांगे यांनी हवालदार राजाराम कोळी, सुधाकर पाटील, सचिन आटपाडकर, श्रीशेल वळसंगकर, सचिन पलूसकर यांच्यासह सकाळी ११ वाजता छापा टाकला. दुपारच्या उन्हामुळे उसातील गांजाची झाडे काढताना पोलिस घामाघूम झाले. सायंकाळी सात वाजता ही कारवाई पूर्ण झाली. उमदी पोलिस ठाण्यात पट्टनशेट्टी बंधूंवर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sangli News Ganja seized in Karajagi

टॅग्स