आळसंदमध्ये पावणेदोनवर्षीय मुलगी बेपत्ता

विजय पाटील
बुधवार, 20 जून 2018

सांगली - खानापुर तालुक्यातील आळसंद या गावातील प्रचिती संदिप किर्दत (वय-पावणेदोन वर्षे) ही मुलगी बेपत्ता झाली आहे. घरा  शेजारीच असणाऱ्या आरफळ कालव्यामधुन ती वाहुन गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कालपासुन पोलीसांसह शेकडो नागरिकांनी शोधमोहिम सुरू केली आहे. अचानक 'गायब' झालेल्या या घटनेने कुटुंबासह नागरिकांतुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

आळसंद येथील कमळापुर रोडवर नामदेव पिराजी जाधव यांचे घर आहे. काल सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान वडिल संदीप हे घराजवळ काम करत असताना समोरच प्रचिती ही खेळत होती. पण तेथून ती अचानकच गायब झाली. कुटुंबातील अनेकांनी शोधाशोध सुरु केली. घराजवळ असणाऱ्या ऊस, विहिर व इतर सर्व ठिकाणचा नातेवाईकांनी तपास घेतला, परंतु प्रचिती हिचा कोणताच तपास लागला नाही. 

घराजवळुनच आरफळ योजनेचा कालवा गेला आहे, त्यात मुलगी पडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात  आहे. पहाटे तीन वाजेपर्यंत शोध घेण्यात आला परंतु तिचा तपास लागला नाही. याची माहिती परिसरातील नागरिकांना होताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. याबाबतची नोंद विटा पोलीसांत करण्यात आली असुन पोलीस घटनास्थळी जावुन तपास सुरु ठेवला आहे.

Web Title: Sangli News girl missing incidence in Aalsanda