सांगली जिल्ह्यात कर्जबाजारी दाक्ष उत्पादकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

मिरज -  बॅंकेचे कर्ज आणि द्राक्षबागेवर आलेल्या रोगराईस कंटाळून मिरज तालुक्‍यातील लिंगनूर गावातील तुकाराम गोपू चौगुले (वय ५०) या शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.

तीन एकर शेतीपैकी दीड एकरावर द्राक्षबाग, अर्धा एकर ऊस, आणि अर्धा एकर पडीक अशी पार्श्वभूमी असलेल्या तुकाराम चौगुलेची शेती तीन वर्षांपासून तोट्यात आहे. नेहमीप्रमाणे द्राक्षबागेसाठी चौगुले यांनी दोन वर्षांपूर्वी एका बॅंकेच्या बेडग शाखेतून सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जाचा वार्षिक हप्ता अडीच लाख रुपयांचा आहे. गेल्या वर्षी लावलेला ऊस सततच्या पावसाने रोगाला बळी पडला. तर द्राक्षावर दावण्याने हल्ला केला.

गेल्या वर्षी द्राक्षाचे केवळ ८० हजार ऊत्पन्न मिळाल्याने तुकाराम यांना मानसिक धक्का बसला. या वर्षीच्या पावसाने तर सारेच संपले. तुकाराम यांना पत्नी, गणेश आणि नीलेश ही दोन मुले आहेत. या दोघांनीही शिक्षण सोडून वडिलांना शेतीमध्ये मदत करण्यास सुरवात केली होती. मंगळवारी (ता. १७) रोजी सायंकाळी पत्नी शांताबाई आणि मुलगा नीलेश ही दोघे दवाखान्यात गेले होते तर दुसरा मुलगा गणेश हा कामानिमित्त बाहेर गेला होता. याचवेळी तुकाराम चौगुले यांनी द्राक्षावर मारण्याचे कीटकनाशक पिले. त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Sangli News Grape farmer suicide