कडेगाव तालुक्‍यात मुसळधार पाऊस; रामापूर - कमळापूर पूल पाण्याखाली 

संतोष कणसे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कडेगाव -  तालुक्‍याला आज दुपारी व रात्री परतीच्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे सर्व ओढे-नाले वाहू लागले आहेत. तालुक्‍यातील सोनहिरा, कोतमाई, महादेव आदी ओढ्यांना पूर आला आहे. तर येरळा व नांदणी नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे. रामापूर-कमळापूर येथील येरळा नदीवर कमी उंचीचा पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

तालुक्‍यात कालपासून पुन्हा मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. आज सकाळपासून हवेत प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. दुपारी जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रात्री सव्वाआठच्या सुमारासही पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे तालुक्‍यातील सर्व ओढे-नाल्यांना पूर आला आहे. येरळा व नांदणी नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रामापूर-कमळापूर येथील येरळा नदीवर कमी उंचीचा असलेला पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

सोनहिरा तलावाचे दरवाजे उघडले 
चिंचणी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा तलाव आधीच भरला आहे. काल शनिवारी रात्री व आज रविवारी दुपारनंतर सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे या तलावाचे दोन दरवाजे प्रत्येकी तीन फुटांनी उचलले आहेत. त्यामुळे सोनहिरा ओढ्याच्या पुलांवरूनही पाणी वाहत आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

Web Title: sangli News heavy rain in Kadegaon Talunka