सांगलीत रस्त्यावर फुललाय बनावट हेल्मेटचा बाजार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सांगली - दुचाकीस्वारांनी हेल्मेट  वापरण्याविषयी प्रबोधन केले जात आहे. प्रारंभी सक्ती केली गेली. मात्र नंतर ती शिथिल करण्यात आली. जे दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. त्यानंतर दंडाचा भुर्दंड सोसाण्याऐवजी दुचाकीस्वारांनी स्वस्तातील आणि हलक्‍या प्रतीच्या हेल्मेटच्या खरेदीस  सुरवात केली. केवळ दिखाऊ हेल्मेटमुळे कारवाई टळते, मात्र जीव वाचणार का? हा प्रश्न असल्याने हेल्मेटच्या दर्जाचीही तपासणी होणे गरजेचे आहे.

दुचाकीस्वारांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश दुचाकीस्वार याकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळेच गेल्या वर्षात हेल्मेटअभावी १६५ जणांना जीव गमवावा लागला. विशेषतः महामार्गांवर याचे प्रमाण जास्त असल्याने पोलिसांनी महामार्गांवर हेल्मेट सक्तीचे जाहीर केले. त्यानंतर अनेकांनी त्याचे स्वागत केले. मात्र शहरात हेल्मेट सक्तीला विरोध झाला. त्यानंतर सक्ती मागे घेण्यात आली. तरी पोलिसांनी प्रबोधन मात्र सुरूच ठेवले आहे. काही दुचाकीस्वारांनी घरात धूळ खात पडलेले हेल्मेट काढून वापर सुरू केला आहे.

पोलिसांच्या हेल्मेट सक्तीचा हेल्मेट विक्रेत्यांकडून मात्र मोठा गैरफायदा घेतला जात आहे. दुकानांत ब्रॅंडेड हेल्मेटच्या किमती वाढल्या आहेत. शहरातही अनेक ठिकाणी स्वस्तातील हेल्मेटची विक्री सुरू झाली आहे. अवघ्या दोनशे ते तीनशे रुपयांत फायबर आणि हलक्‍या दर्जाची हेल्मेट विकली जात आहेत. विशेष म्हणजे यावर आयएसआय मार्क असल्याचे सांगून हेल्मेट खपवण्याचे काम विक्रेते करीत आहेत. हेल्मेट सक्तीतून पळवाट काढण्याचा फंडा दुचाकीस्वार वापरत आहेत. स्वस्तातील हेल्मेट विकले जात असल्यामुळे दुचाकीस्वारांच्या डोक्‍यावरील हेल्मेटचा वापर नक्कीच वाढेल. पण बनावट हेल्मेटमुळे सुरक्षेचा मूळ हेतू बाजूलाच पडत आहे. हेल्मेटची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा सध्या उपलब्ध नसल्याने बनावट हेल्मेट विक्री राजरोस सुरू आहे.

‘आयएसआय’ ला फसू नका..
शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर बसून हलक्‍या दर्जाची हेल्मेट विकली जात आहे. मूळत: ब्रॅंडेड कंपन्यांत तयार होणाऱ्या हेल्मेटची विविध टप्प्यांवर चाचणी घेऊनच विकली जातात. रस्त्यावर विकणाऱ्या हेल्मेटला जरी आयएसआय मार्क असला तरी तो प्रत्यक्षात खरा आहे का, याची तपासणी करायला हवी. त्यामुळे हेल्मेट खरेदी करताना नामांकित उत्पादक कंपनीला महत्त्व दिले पाहिजे. एवढे मात्र खरे.

Web Title: sangli news helmet