मिरजेच्या डॉ. देशमुख यांचा "आयर्नमॅन' किताबाने सन्मान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

मिरज - खडतर ट्रायटॉलॉन म्हणून प्रसिद्ध "आयर्नमॅन' जागतिक स्पर्धा कझाकिस्तान येथे यशस्वीरित्या पुर्ण करून मिरजेच्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमित देशमुख यांनी "आयर्नमॅन' सन्मान मिळवला. "आयर्नमॅन' प्राप्त डॉ. देशमुख मिरजेतील पहिली व्यक्ती आहेत. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर "आयर्नमॅन' मान्यता प्राप्त बायग्रुप संस्थेतर्फे कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये स्पर्धा झाली. 47 देशातील 1200 स्पर्धक सहभागी झाले. ट्रायटॉलॉनमध्ये दोन कि.मी. पोहणे, 90 कि.मी. सायकलिंग व 21 कि.मी. धावणे अशी स्पर्धा एका दिवसात एकत्रित पूर्ण करायची असते.

डॉ. देशमुख यांनी आठ तास 14 मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली. त्यांना आयर्नमॅनचा किताब प्रदान करण्यात आला. प्रमुख संयोजक ऍलेक्‍सी व सिड्रॉप्सी होते. स्पर्धेसाठी जलतरण प्रशिक्षक अर्जुन मगदूम व क्रीडा प्रशिक्षक निरंजन देशपांडे (पुणे), फिरोज आंबेर्डेकर, आदर्श फिटनेस सेंटर रनिंगचे प्रशिक्षक महेश शेळके, स्वप्नील माने, अमरपाल सिंग कोहली, विशाल कोथळे, महेश मेटे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. 

Web Title: Sangli News Iron Man award to Dr. Amit Deshmukh