इस्लामपूर पालिकेत नगराध्यक्ष - पक्षप्रतोद यांच्यात खडाजंगी

धर्मवीर पाटील
बुधवार, 13 जून 2018

इस्लामपूर - मागील प्रोसिडिंग वाचून कार्यवृत्त कायम करण्याच्या विषयावरून नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. नगराध्यक्ष पाटील यांनी बैठक संपेपर्यंत विक्रम पाटील यांचे निलंबन करत असल्याचे जाहीर केले; मात्र विक्रम पाटील यांनी त्यांना जुमानले नाही. विक्रम पाटील यांना बाहेर घालवण्यासाठी नगराध्यक्षांनी पोलिसांना बोलवून आणण्याचा आदेश दिला; मात्र मध्यस्थीने हा वाद थांबला.

दोघांचा वाद सुरू असताना शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार, नगरसेवक खंडेराव जाधव, वैभव पवार यांनी मध्यस्थी केली. सभेत बोलायला परवानगी देण्याच्या मुद्द्यावर विक्रम पाटील भडकले. सभेच्या सुरवातीलाच सत्ताधारी गटाच्या नगरसेविका सुप्रिया पाटील यांनीही दारूबंदी ठराव करण्यावरून माझा आवाज दाबला जात आहे, असा आरोप केला.

दरम्यान मागील ठराव वाचल्यावर नगराध्यक्ष पाटील यांनी एका कलमाचा आधार घेत मागील ठरावांवर चर्चा करता येत नाही, काही प्रिंटिंगच्या चुका असतील तर दुरुस्त केल्या जातील, असे सांगितले. त्यावर विक्रम पाटील, विश्वनाथ डांगे यांनी आक्षेप घेत त्यांची बाजू मांडली. चर्चा विषयपत्रिकेनुसारच आणि क्रमवारीनेच होईल, अशी ठाम भूमिका नगराध्यक्षांनी घेतली. यात विक्रम पाटील आणि नगराध्यक्ष यांच्यात खडाजंगी झाली.

आमचा 'अपमान करू नका, सर्वांना बाजू मांडण्याचा अधिकार आहे, उठसुठ कारवाईची धमकी देऊ नका', असे विक्रम पाटील म्हणाले. त्यावर 'कायद्यानुसारच काम होईल, परवानगी शिवाय बोलायचे नाही हे मान्य असेल तर बसा', असे नगराध्यक्षांनी ठणकावून सांगितले. त्यावर 'विकासाच्या मुद्द्यांवर सर्वांनाच बोलू दिले पाहिजे' असे म्हणत विक्रम पाटील यांनी आवरते घेतले. नगराध्यक्षांच्या भूमिकेचे समर्थन करत 'आपण सगळे मिळून एकत्र लढलो आहे' याची जाणीव वैभव पवार यांनी सभागृहात करून दिली.

'तुमचे आता सगळीकडूनच जुळले आहे, त्यामुळे तुम्हाला आता कुणाचीच गरज नाही', असा टोमणा विक्रम पाटील यांनी नगराध्यक्षांना हाणला.

Web Title: Sangli News Islampur Nagar Palika meeting