गिफ्ट हवे की विकास हे लोकांनी ठरवावे - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मिरज - महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिफ्ट घेऊन येतील, पैशांचा महापूर येईल. मतदारांनी पैसा पाहिजे की विकास याचा निर्णय घ्यायचा आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. प्रभाग क्रमांक सातच्या इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 

यानिमित्ताने इच्छुकांची बरीच गर्दी झाली होती. श्री. पाटील म्हणाले, ‘प्रभागात सर्वेक्षण करून जनमताचा कौल घेतला जाईल. त्याच्या आधारेच तिकिटांचे वाटप होईल. तो उमेदवार सर्वांना मान्य करून प्रचार करावा लागेल. निवडणूक कशीही जिंकून सत्ता मिळवायचीच, असा भाजपचा प्रयत्न आहे. गिफ्ट वाटप सुरू झाले आहे. तुमच्याही दारात गिफ्ट घेऊन उमेदवार येतील.

गिफ्ट आणणारा उमेदवार म्हणजेच भाजपचा उमेदवार हे मतदारांनी लक्षात ठेवावे. या वेळी पद्माकर जगदाळे, विराज कोकणे, प्रसाद मदभावीकर यांचीही भाषणे झाली. बैठकीला जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, अभिजित हारगे, प्रार्थना मदभावीकर, सुनीता कोकाटे, सचिन शिरसाळे, संजय बजाज, दिग्विजय सूर्यवंशी, शेडजी मोहिते, विनया पाठक, कमलाकर पाटील, विष्णू माने आदी उपस्थित होते.
 
Web Title: Sangli News Jayant Patil Comment