Kadegaon Farmer Death
esakal
कडेगाव (सांगली) : ढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे उसाच्या वाड्याच्या किरकोळ वादानंतर झालेल्या मारहाणीनंतर एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू (Kadegaon Farmer Death) झाला. विनायक प्रभाकर ढाणे (वय ३५, रा. ढाणेवाडी) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, हा मृत्यू मारहाणीमुळे झाला की अन्य कोणत्या कारणांनी याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.