जत पोलिस ठाण्यासमोरच पुतण्याने चुलत्याला चाकूने भोसकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

जत - पोलिस ठाण्यासमोरच पुतण्याने चुलत्याला चाकूने भोसकल्याची घटना आज दुपारी तीन वाजता घडली. पोलिसासमोरच झालेल्या घटनेमुळे  शहरात खळबळ उडाली. चाकूहल्ल्यात जखमी झालेले नसीर राजासाहेब शेख (वय ४८) यांना तातडीने पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविले. याप्रकरणी अमीर शेख व मोहसीम शेख यास जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जत - पोलिस ठाण्यासमोरच पुतण्याने चुलत्याला चाकूने भोसकल्याची घटना आज दुपारी तीन वाजता घडली. पोलिसासमोरच झालेल्या घटनेमुळे  शहरात खळबळ उडाली. चाकूहल्ल्यात जखमी झालेले नसीर राजासाहेब शेख (वय ४८) यांना तातडीने पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविले. याप्रकरणी अमीर शेख व मोहसीम शेख यास जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जत बस स्थानकासमोर राहणाऱ्या शेख कुटुंबीयांत अनेक वर्षांपासून जागेचा वाद आहे. यावरून शेख कुटुंबीयांत आज सकाळी वाद झाला होता. त्यावेळी दोघांमध्ये मारहाणही झाली होती. हा वाद मिटवण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर झाला पण त्यावर तोडगा निघाला  नाही. दुपारी तीनच्या सुमारास चुलता नसीर शेख, पुतणे अमीर व मोहसीन शेख हे एकमेकाविरुद्ध मारहाण झाल्याची तक्रार देण्यासाठी जत पोलिस ठाण्यात आले होते. या वेळीही त्यांच्यात वाद झाला.

पुन्हा प्रकार
मूळ मुंबईची व सध्या जत तालुक्‍यातील लोहगावची रहिवासी असलेली २३ वर्षीय पूजा सुनील चव्हाण या विवाहित महिलेने २२ फेबुवारीला पोलिस ठाण्यासमोरच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर आज जत पोलिस ठाण्यासमोरच चाकूहल्ल्याची घटना घडल्याने पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.

पोलिसांनी दोन्ही गटाला जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. पोलिस ठाण्याबाहेर येताच चुलता नसीर व पुतण्या अमीर यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. हा वाद पोलिसासमक्ष पोलिस सुरू असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याची गर्दी झाली. काही कळायच्या आत अमीरने चुलते नसीर यांच्यावर छातीत चाकूने भोकसले. यात वर्मी घाव बसल्याने नसीर गंभीर जखमी झाले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावपळ झाली. प्रसंगाधावन राखून तातडीने जत पोलिसाने जखमी नसीर यास ग्रामीण रुग्णालयात हलवले त्यानंतर त्यांना  पुढील उपचारासाठी सांगलीला हलवले. घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेले सहायक पोलिस निरीक्षक गजानन कांबळे यांनी चाकूहल्ला करणारे अमीर व त्याच्यासोबत असलेल्या मोहसीनला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

Web Title: Sangli News knife attack incidence in Jat