कुपवाड ‘एमआयडीसी’तील ६५ एकर जमिनीवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कुपवाड - औद्योगिक वसाहतीत वनीकरणासाठी राखीव असलेल्या जागा उद्योजकांनी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ६५ एकर जागेवर हा डल्ला मारण्यात आला असून त्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये होते. प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर आता औद्योगिक विकास महामंडळाने १९ जणांना नोटिसा देण्याची तयारी केली आहे. पैकी ज्ञानदीप विकास संस्थेची जागा ताब्यात घेण्यात आली आहे. 

कुपवाड - औद्योगिक वसाहतीत वनीकरणासाठी राखीव असलेल्या जागा उद्योजकांनी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ६५ एकर जागेवर हा डल्ला मारण्यात आला असून त्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये होते. प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर आता औद्योगिक विकास महामंडळाने १९ जणांना नोटिसा देण्याची तयारी केली आहे. पैकी ज्ञानदीप विकास संस्थेची जागा ताब्यात घेण्यात आली आहे. 

जिल्ह्यात १ हजार ७५० लहान-मोठे उद्योग आहेत. त्यातून २५ हजार कामगारांचे कुटुंब चालते. कुपवाड औद्योगिक वसाहत जिल्ह्यातील एक प्रमुख केंद्र आहे. ५१६ हेक्‍टरमध्ये पसरलेल्या वसाहतीत ७८८ छोटे-मोठे उद्योग आहेत. उद्योग वाढ करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काही जागा वनराईसाठी राखून ठेवल्या जातात. त्या जागा नजीकच्या उद्योजकांनी वृक्ष लागून विकसित कराव्यात, झाडांचे संगोपन करावे, असे अपेक्षित असते. या कायद्यातील पळवाटेला बरोबर  फायदा उठवत पर्यावरणाच्या नावाखाली जागा हडपण्याचा उद्योग येथे झाला आहे. सध्या या जागेवर एक टक्काही वनीकरण नाही. त्याउलट या जागांवर उद्योगच उभारले गेले आहेत. त्यात काही बड्या नावांचा समावेश आहे. राजकीय क्षेत्रातील त्यांचे ‘वजन’ वापरून या गोष्टी वर्षानुवर्षे दडपण्यात आल्या आहेत. 

या प्रकरणी खदखद सुरू झाल्यानंतर आता औद्योगिक विकास महामंडळाला जाग आली आहे. त्यांनी १९ जणांची यादी तयारी केली आहे. त्यातील उद्योजक प्रवीण लुंकड यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा व्हॅली ॲग्रो इंडिया कंपनीने लठ्ठे पॉलिटेक्‍निक लगतची दहा एकर जागा औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेतली. त्यानंतर हा सारा प्रकार उघडीस आला. सध्या कुपवाड औद्योगिक वसाहतीतील ६५ एकर जागेवर अनधिकृत बांधकाम  केले असून, जागा ढापल्या आहेत. हे केवळ वनीकरणांच्या जागेचा डल्ला आहे. तसेच खुल्या जागावर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. 

पावणेदोनशे कोटी कसे?
सध्या औद्योगिक वसाहतीत औद्योगिक विकास महामंडळाच्या दरानुसार ४० लाख एकरी दर आहे. परंतु सध्या औद्योगिक वसाहतीतील बाजारभावानुसार ७ लाख रुपये गुंठ्याचा दर आहे. त्यामुळे प्रतिएकर २ कोटी ८० लाख रुपये किंमत आहे. त्यानुसार ६५ एकर जागेची किंमत सुमारे पावणेदोनशे कोटी होते. 

या जागांवर मारला डल्ला

* भूखंड क्रमांक                          * क्षेत्रफळ (चौ. मी)     * धारकाचे नाव 

*ओ-एस-अे पार्ट                     *४९२००                      *सीईटीपी 
*ओ-एस-अे पार्ट-१                  *४०९३८                      *मे. कृष्णा व्हॅली ॲग्रो 
*ओ-एस-बी १                       * ९१९०                       * ज्ञानसंकल्प संस्था 
*ओ-एस-आय                       * ८४५६                      *ज्ञानदीप विकास संस्था 
*ओ-एस-जे                          * ९८९०                      *सीईटीपी ट्रीटमेंट प्लॅंट
*ओ-एस-के                         * १३११०                      *नवमहाराष्ट्र पोर्ट लॅंड सिमेंट
*ओ-एस-एल                        *२८४१६                    *सूरज फाऊंडेशन 
* ओ-एस-एम                       *१४१९२                    *नव महाराष्ट्र चाकण लिमिटेड
* ओ-एस-एन                       *१८९०                     *मे. सर्वहित सोसायटी 
* ओ-एस-ओ                       *१६२०                     *मानधना टेक्‍सटाईल्स मिरज
* ओ-एस-सी                       *१६२७२               *लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली   
* ओ-एस-डी                      * १८२०                     *लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलीटेक्‍नीक
*ओ-एस-एच                      *४००                         *जवाहर शिक्षण संस्था
*ओ-एस-एच पार्ट                 *३२०                         *जवाहर शिक्षण संस्था 
* ओएस - ११                   *२८३३०                      *सूरज फाऊंडेशन

Web Title: sangli news kupwad MIDC land issue