शिकाऊ वाहन परवाना तासात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

सांगली - शिकाऊ वाहन परवान्यासाठी बायोमेट्रिक टेस्ट...कागदपत्र पडताळणी...साडे सात मिनिटांची संगणकावरील परीक्षा दिल्यानंतर तासात लॅमिनेटेड वाहन चालवण्याचा परवाना मिळणार आहे. येथील आरटीओ कार्यालयात आज झटपट शिकाऊ वाहन परवाना देण्याचा उपक्रम सुरू झाला. 

शिकाऊ वाहन परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्यानंतर दिलेल्या तारखेला रांगेत थांबून बायोमेट्रिक टेस्ट, फोटो, कागदपत्रे पडताळणी, संगणकावर चाचणी हा खटाटोप करण्यासाठी एक दिवस रजाच काढावी लागते. परंतू परिवहन आयुक्तांनी सात जुलै रोजी बैठक घेऊन सर्व आरटीओंना शिकाऊ वाहन परवाना तातडीने देण्याचे निर्देश दिले. 

कराड, कोल्हापूरनंतर आज सांगलीत उपक्रम सुरू झाला. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार, सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, कराड उपविभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी काहींना अर्ध्या तासातच परवाना देण्यात आला. 

सांगलीत शिकाऊ वाहन परवान्यासाठी रोज 120 जणांना अपॉईंटमेंट दिली जाते. बायोमेट्रिक टेस्ट, फोटो आणि कागदपत्रे पडताळणीसाठी तासनंतास थांबण्याची गरजच भासणार नाही. टेस्ट, पडताळणी आणि परीक्षा दिल्यानंतर काही मिनिटात लॅमिनेटेड परवाना हाती मिळेल. 

आज पहिल्या दिवशी अर्ध्या तासात अनेकांना परवाना मिळाला. तासात परवाना कोणत्याही स्थितीत हातात दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले. 

पक्का परवाना तीन दिवसात पोस्टात- 
वाहन चालवण्याचा पक्का परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात पोस्टात पाठवला जाईल. त्यामुळे तेथून संबंधितांना तत्काळ घरच्या पत्त्यावर परवाना मिळू शकेल असे श्री. पवार यांनी यावेळी जाहीर केले.

Web Title: sangli news learning driving license