अच्युत गोडबोले, निलांबरी जोशी यांना पुस्तक सन्मान पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

इस्लामपूर - राष्ट्रीय मराठी मानसशास्त्र परिषदेच्यावतीने मानसशास्त्रीय क्षेत्रातील उत्कृष्ट लेखनासाठी दिला जाणारा यंदाचा मराठी मानसशास्त्र परिषद (ममाप) पुस्तक सन्मान पुरस्कार ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले व निलांबरी जोशी यांच्या 'मनकल्लोळ' या पुस्तकास जाहीर झाला आहे.

इस्लामपूर - राष्ट्रीय मराठी मानसशास्त्र परिषदेच्यावतीने मानसशास्त्रीय क्षेत्रातील उत्कृष्ट लेखनासाठी दिला जाणारा यंदाचा मराठी मानसशास्त्र परिषद (ममाप) पुस्तक सन्मान पुरस्कार ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले व निलांबरी जोशी यांच्या 'मनकल्लोळ' या पुस्तकास जाहीर झाला आहे. राष्ट्रीय मराठी मानसशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष मानसतज्ञ कालिदास पाटील यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, "अच्युत गोडबोले यांची मनात, मुशाफिरी, गणिती, गुलामी, झपुरझा, लाईमलाईट या प्रसिद्ध ग्रंथांच्या बरोबरच मानवी मनाचा शोध घेणारा व निरोगी मनस्वास्थ्यासाठी मानसतज्ञांना दिशादर्शक ठरणारे मनकल्लोळ हे पुस्तक मानसशास्त्र विषयाची उंची वाढविणारे आहे. नवोदित मानसतज्ज्ञांना दिशा देणारे आहे. मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना हे पुस्तक उमेद व उभारी देणारे आहे. अनेकांच्या वेदनादायी प्रवासातील महत्त्वपूर्ण आधार आहे. त्यामुळे या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.

मानसशास्त्र परिषद ही शिखर संस्था आहे. हा पुरस्कार मानाचा समजला जातो. ३१ जानेवारीला मालेगाव-नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे."

Web Title: Sangli News Mamap award to Ajut Godbole, Nilambari Joshi