आफ्रिकेत कॉम्रेडस्‌ मॅरेथॉनमध्ये मराठी झेंडा  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

आरग - बेडग ( ता. मिरज ) येथील किसन पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. 90.184 किलोमीटरचे अंतर 11 तास 47 मिनिटे 42 सेकंदांत पुर्ण केले. 

आरग - बेडग ( ता. मिरज ) येथील किसन पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. 90.184 किलोमीटरचे अंतर 11 तास 47 मिनिटे 42 सेकंदांत पुर्ण केले. 

जगातील सर्वांत खडतर गणली जाणारी कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन स्पर्धा पीटर मार्टीनबर्ग ते डर्बनदरम्यान पार पडली. तेथील कॉम्रेडस्‌ मॅनेजमेंट असोसिएशन ही संस्था स्पर्धा आयोजित करते. यंदा जगभरातील 19 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला; त्यातील 16 हजार 477 धावपटूंनाच नियोजित बारा तासांत अंतर पुर्ण करता आले. पुण्यातील पिंपरी-चिंचवडचे वेणुगोपाल ( 11 तास 20 मिनिटे 47 सेकंद ), किसन पाटील ( 11 तास 47 मिनिटे 42 सेकंद व चंद्रकांत पाटील ( 11 तास 47 मिनिटे 51 सेकंद ) या तिघांनी नियोजीत वेळेत शर्यत पुर्ण केली.

या अंतरात सात ते आठ टेकड्या पार करायच्या होत्या. तब्बल 32 किलोमीटर अंतरात चढ, घाट आणि वळणे होती. किसन पाटील म्हणाले, "स्पर्धेपुर्वी सहा महिने अगोदर सराव केला होता. प्रत्यक्ष स्पर्धेत बराच कस लागला. शारीरीक आणि मानसिक क्षमतेची सहनशीलता पाहणारी ही स्पर्धा होती. मार्गावर प्रत्येक गावातील रहिवासी स्पर्धकांना पाणी, खाद्यपदार्थ देऊन प्रोत्साहन देत होते. आम्ही तिघांनी पिंपरी चिंचवड रनर्स क्‍लबमार्फत स्पर्धेत सहभाग घेतला. किसन पाटील सध्या पुण्यात लघुउद्योजक आहेत. या यशाबद्दल बेडग ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. 

Web Title: Sangli News Marethon competition in Deccan Africa