‘मार्शल’ला सन्मानाने निरोप

विजय पाटील
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सांगली - सांगली पोलिस दलात गेले दशकभर सेवा बजावणाऱ्या स्नीपर डॉग मार्शलला मोठ्या दिमाखात सेवानिवृत्ती देण्यात आली. हा श्‍वान बाॅम्बशोधक व नाशक पथकात कार्यरत होता. एका सजवलेल्या जीपवर मार्शलला बसवून त्याला मानवंदना देण्यात आली. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीनिमित्त ज्या सन्मानाने निरोप दिला जातो, तशाच पद्धतीने मार्शलला निरोप देण्यात आला.

सांगली - सांगली पोलिस दलात गेले दशकभर सेवा बजावणाऱ्या स्नीपर डॉग मार्शलला मोठ्या दिमाखात सेवानिवृत्ती देण्यात आली. हा श्‍वान बाॅम्बशोधक व नाशक पथकात कार्यरत होता. एका सजवलेल्या जीपवर मार्शलला बसवून त्याला मानवंदना देण्यात आली. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीनिमित्त ज्या सन्मानाने निरोप दिला जातो, तशाच पद्धतीने मार्शलला निरोप देण्यात आला.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक अंतम खाडे, बीडीडीएसचे उपनिरीक्षक अनिल गायकवाड, प्रशांत मांडके, किशोर पवार, उदय पोतदार आदी उपस्थित होते.

या श्‍वानाने सांगली पोलिस दलात आठ वर्षे सेवा बजावली. स्नीपर मार्शल डॉग हा ४ ऑगस्ट २००९ ते १० एप्रिल २०१८ पर्यंत कार्यरत होता. डॉग मार्शल याने व्ही.आय.पी. व व्ही.व्ही.आय.पी. थेट कॉल, बाॅम्ब कॉल आदी कामे पाहिली असून, त्याची उल्लेखनीय कामगिरी सन २०१६ मध्ये कवलापूर या गावी जिलेटीन डेटोनेटर व टायमर असलेली गावठी  बाॅम्बने भरलेली बॅग शोधून काढलेली होती. यावेळी त्याचे हॅंडलर पोलिस नाईक संजय कोळी व संजय सनदी उपस्थित होते. सेवानिवृत्तीनंतर डॉग मार्शलची जबाबदारी त्याचे हॅंडलर संजय कोळी यांनी घेतली आहे. 

5 ऑगस्ट 2009 साली या श्वनाला सांगलीतुनच खरेदी करण्यात आल्यानंतर मार्शल सांगली पोलीस दलात दाखल झाला. या श्वानाने पोलीस दलात दाखल झाल्यापासून व्हीआयपी सुरक्षा, महत्वाचे दौरे, धार्मिक स्थळांची सुरक्षा याबाबत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिवाय पंढरपूर वारी, आयपीएल मॅच, तुळजापूर जत्रा अशा ठिकाणीही मार्शल श्वानाने घातपात विरोधी पथकाद्वारे चमकदार कामगिरी केली आहे. गेली आठ वर्षे या स्वानाने सांगली पोलीस दलासाठी जीव जोखमीत घालून एक कर्मचारी म्हणून काम केले आहे.

- अनिल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक 

सध्या 9 वर्षांचा असणारे हे श्वान हा 38 किलो वजनाचे आहे. आज पोलिस दलाच्या नियमानुसार तो आठ वर्षे पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त झाला आहे. त्यामुळे एका पोलीस कर्मचाऱ्या प्रमाणेच मार्शल श्वानांची सेवानिवृत्ती पोलिस दलाकडून करण्यात आली. यामध्ये सजवलेल्या गाडीत बसवून मार्शल श्वानाची पोलीस मुख्यालयात परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. 

 

Web Title: Sangli News Marshal Dog retirement