घोरपडेंच्या संघाकडून अखेर 50 पैसे दरवाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

सांगली - कवठेमहांकाळ येथील शेतकरी दूध संघाने अखेर म्हैशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 50 पैसे वाढ करण्याचा निर्णय घेतला. भाजप नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील हा संघ कार्यरत आहे. सरकारने दरवाढ केल्यानंतरही त्यांनी दर जैसे थे ठेवले होते. ते किमान दराच्या 50 पैसे कमी होते. "सकाळ' ने त्यावर प्रकाश टाकला होता. 

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गेल्या महिन्यात राज्यातील म्हैस, गायीच्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. प्रतिलिटर तीन रुपयांनी खरेदी दर वाढवले, मात्र विक्री दरात वाढ करायची नाही, असा आदेश दिला. त्यानुसार म्हैशीचे दूध खरेदी दर 36 रुपये तर गायीचा दूध खरेदी तर 27 रुपये झाला. विक्री दरात वाढ न झाल्याबद्दल अनेक संघांनी नाराजी व्यक्त केली, मात्र सरकारी दराचा नियम पाळला. जिल्ह्यातील बहुतांश संघांचा म्हैशीच्या दुधाचा खरेदी दर हा वाढलेल्या सरकारी दरापेक्षा जास्त होता. त्याला वसंतदादा दूध संघ (35.50 रुपये) आणि शेतकरी संघ (35.50 रुपये) अपवाद होते. वसंतदादा संघाने 50 पैशांची वाढ करून खरेदी दर 36 रुपये केला. सर्वच संघांनी गायीच्या खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करून ते 27 रुपये केले. परंतू, शेतकरी संघाने म्हैशीच्या दूध खरेदी दरात वाढ केली नव्हती. त्याविषयी मिरजेतील शासकीय दूध डेअरीतून विचारणा झाल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. 

"सकाळ'ने "दूध दरवाढ आठआणा, बाकी ठणाणा' या वृत्तातून प्रकाश टाकला होता. भाजप नेत्यानेच नियम मोडल्याचा मुद्दा मांडला. श्री. घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील संघ कायदा पाळत नसल्याचे समोर आल्यानंतर तत्काळ नव्या दराप्रमाणे 50 पैशांची वाढ जाहीर केली. त्या काळातील फरकही सभासदांना देऊ केल्याचे शासकीय दूध डेअरीकडे कळवले आहे.

Web Title: sangli news milk