#MilkAgitation शिरढोण फाट्यावर गाईस दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध

विजय पाटील
गुरुवार, 19 जुलै 2018

सांगली - जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन केले. गाईला दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध व्यक्त केला.

सांगली - जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन केले. गाईला दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध व्यक्त केला.

दुधाला खरेदी दर वाढवून मिळावा यासाठी गेल्या चार दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास शेतकऱ्यांनी ही प्रतिसाद दिला आहे. आज महाराष्ट्रभर विविध ठिकामी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन केले. गाईला दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच या सरकारला अजूनही जाग नाही आली तर येथून पुढे मंत्र्यांच्या गाड्या अडवू असा इशाराही यावेळी देण्यात आला

दुधाला दरवाढ मिळावी, दुध पावडरीवरील निर्यात बंदी उठवावी यासाठी दुध उत्पादक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करत आहेत. भारतीय जनता पक्षाने याची दखल घ्यावी व न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल. 
- महेश खराडे,
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता 

Web Title: Sangli News Milk agitation in Shirdhon Phata