सांगली महापालिकेच्या मैदानात एमआयएमची एन्ट्री

संतोष भिसे
गुरुवार, 3 मे 2018

मिरज - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिरजेच्या राजकीय क्षेत्रात एमआयएमची एन्ट्री होत आहे. सांगली-मिरजेत किमान तीस जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांवर लक्ष केंद्रीत करुन जागा लढवल्या जाणार आहेत. "जय भीम-जय मीम" या नाऱ्यासह महापालिकेत प्रवेश करु" असा विश्‍वास पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष शकील पिरजादे यांनी व्यक्त केला. 

मिरज - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिरजेच्या राजकीय क्षेत्रात एमआयएमची एन्ट्री होत आहे. सांगली-मिरजेत किमान तीस जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांवर लक्ष केंद्रीत करुन जागा लढवल्या जाणार आहेत. "जय भीम-जय मीम" या नाऱ्यासह महापालिकेत प्रवेश करु" असा विश्‍वास पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष शकील पिरजादे यांनी व्यक्त केला. 

उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी मिरजेत येणार आहेत; शिवाय दोन आमदार आणि पक्षाचे काही नगरसेवकही प्रचाराच्या आघाडीवर असतील. मुस्लिम मतदार बहुसंख्येने असणाऱ्या मिरज शहरात गेल्या सात-आठ वर्षांपासून एमआयएमच्या राजकीय एन्ट्रीच्या चर्चा झडत आहेत. विशेषतः मिरज दंगलीनंतर चर्चेला वेग आला.

विधानसभा, लोकसभा आणि यापुर्वीची महापालिका या तीनहीवेळी एमआयएमच्या एन्ट्रीची हवा झाली; मात्र पक्षाने सबुरीचे धोरण स्विकारले. यावेळी मात्र शड्डू ठोकला आहे. 
पिरजादे म्हणाले, प्रभाग क्रमांक पाच, सहा आणि सातवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे; शिवाय दोन, तीन, चार, चौदा आणि पंधरा येथेही उमेदवार असतील.

काही दिवसांपुर्वी हैदराबादमधील पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा झाली. त्यांनी महापालिका क्षेत्राची राजकीय माहीती घेतली. मतदारांची मानसिकता, राजकीय आणि आर्थिक गणिते, युतीचे वारे याचा अंदाज घेतला. पक्षाकडून निवडणुक लढवू इच्छिणाऱ्यांची यादी आणि पार्श्‍वभूमी जाणली. येत्या पंधरवड्यात मिरजेत पुन्हा काही वरिष्ठ येतील; त्यामध्ये उमेदवारांची यादी बहुतांश निश्‍चित होईल. 

- शकील पिरजादे

ते म्हणाले, मिरज पॅटर्नने शहराच्या विकासाऐवजी स्वतःच्या कल्याणासाठीच महापालिकेचा वापर केला. नवे नेतृत्व वर येऊ दिले नाही. एमआयएमने पॅटर्न मोडीत काढण्याचा निश्‍चय केला आहे. सुशिक्षीत, नवतरुणांना संधी दिली जाईल. मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार आमचा पाठीराखा असेल. मिरजेत सुमारे 48 हजार मुस्लिम आणि 55 ते 60 हजार मागासवर्गीय मतदार आहेत; त्यांच्यापर्यंत "जय भीम-जय मीम" नाऱ्यासह पोहोचू. मिरज पॅटर्नला हा भक्कम पर्याय असेल. आम्ही निवडणुकीत उतरल्याने मुस्लिम मतांची फाटाफुट होईल अशी भिती काहीजणांना आहे; आमच्या प्रभागात उमेदवार उभे करु नका अशी विनंती त्यांनी केली आहे; पण आम्ही निर्णायक लढत देणार आहोत.

ओवेसींच्या सभा
प्रचारमोहीमेदरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसींची किमान एक सभा मिरजेत होईल. त्याशिवाय आमदार अकबर ओवेसी, इम्तीयाज जलील, वारीस पठाण हेदेखील येतील. पदयात्रा, बैठका आणि जाहीर सभा असे स्वरुप असेल. "पहिल्यांदा पक्षप्रवेश मगच उमेदवारी" असे सूत्र राबवले जाईल. युती किंवा पाठींबा याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल. 

विधानसभा, लोकसभेचा अंदाज येईल
आगामी विधानसभा आणि लोकसभेची निवडणुक मिरज-सांगलीतून लढवण्याच्यादृष्टीने महापालिकेची निवडणुक चाचणी ठरेल असे एमआयएमचे गणित आहे. 

Web Title: Sangli News MIM entry in Corporation election