रस्ता दुभाजकावर आदळून मोटार उलटली (व्हिडिआे)

विजय पाटील
मंगळवार, 29 मे 2018

सांगली - जिल्हा परिषदेसमोर आज दुपारी रस्त्यावरील दुभाजकावर आदळून मोटार उलटली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला आहे.

सांगली - जिल्हा परिषदेसमोर आज दुपारी रस्त्यावरील दुभाजकावर आदळून मोटार उलटली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की जिल्हा परिषदेसमोर पुष्कराज चौकातून राम मंदिराकडे एक मारुती मोटार भरधाव वेगाने जात होती. यावेळी राष्ट्रवादी कार्यालयासमोरून वळणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला चुकवण्याच्या प्रयत्नांत मारुती ओमनी रस्ता दुभाजकावर आदळून उलटली. त्यामुळे हा अपघात पाहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांचा चांगलाच थरकाप उडाला. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालेले नाही. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Web Title: Sangli News Motor accident in CCTV