महापालिकेची वेबसाइट कशी ‘गोल, गोल...’

शैलेश पेटकर
रविवार, 23 जुलै 2017

प्रशासनाचे दुर्लक्ष - कसा होणार हायटेक बदल?, केवळ आश्‍वासनेच

सांगली - ‘‘सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय?’’ या गाण्याने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. या गाण्यातील ‘गोल गोल...’सारखीच सांगली महापालिकेची वेबसाइट ‘गोल गोल..’ दिसू लागलीय. पारदर्शी कारभाराबरोबरच महापालिका स्मार्ट बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात आहे; परंतु, महापालिकेची अधिकृत वेबसाइट पाहिल्यावर ‘गोल, गोल..’ प्रकार साऱ्यांच्या नजरेस पडतो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. महापालिकेचा हायटेक बदल कसा होणार, याचे प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 

मोठमोठ्या कार्यक्रमांच्या घोषणा एकीकडे करीत असताना महापालिकेने आपली वेबसाइट अपडेट करण्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

वेबसाइटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला असंख्य नागरिकांशी सहजपणे संवाद साधता येतो, याचे भानच महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसून येते. महापालिकेने बनविलेल्या वेबसाइटची माहिती अजूनही नागरिकांना नाही. वेबसाइट ॲड्रेसचा प्रचार करण्यात येत नाही. महापालिकेशी संबंधित संपूर्ण माहिती व अनेक कामे वेबसाइटवरून ऑनलाइन कशी करता येतील, यासंबंधी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत नसल्याने ‘व्हिझिटर्स’ची संख्या कमी आहे. 

शासनाने ई-गव्हर्नन्सच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या कंपनीमार्फत वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटवर सातत्याने माहिती अपडेट करण्याचे काम महापालिकेचे आहे. महापालिकेच्या वेबसाइटवर गेल्यानंतर शहराविषयी माहितीच केवळ दिसते. महापालिकेचे विविध ठराव, वार्षिक बजेट गेल्या मे २०१६ पासून अपटेड नाहीत. तथापि, या वेबसाइटचा सध्या उपयोग नाही, असेच दिसत आहे. वेबसाइटवर महापौर व आयुक्तांची छायाचित्रे असली, तरी त्यांचे संदेश किंवा त्यांची माहिती दिलेली नाही. वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार नोंदणीसाठी स्वतंत्र क्‍लिक असले, तरी त्याचाही काही उपयोग नाही.

वेबसाइट अपडेट नाही
वेबसाइटवरून महापालिकेला एखादी तक्रार नोंदणी करायची असल्यास अर्ज भरून तो सादर करण्याची सोय आहे. मात्र, आतापर्यंत वेबसाइटवर ऑनलाइन किती तक्रारी आल्या व किती तक्रारींचे निरसन झाले, याची माहिती महापालिकेकडून मिळू शकली नाही. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाइल नेट असून, नेटिझन्सची संख्या वाढत असताना आतापर्यंत महापालिकेची वेबसाइट अपडेट नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: sangli news municipal website