नफरत के नाम पे, और कितने इन्सान मारोगे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

सांगली - देशभरात गोरक्षेच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसाचाराविरोधात आज सांगलीत विविध पक्ष, संघटनांनी एकत्र येत विरोध दर्शवला. समाजात निर्माण झालेले दुहीचे वातावरण संपवण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन एकोप्याचा संदेश देण्यासाठी सारे कटिबद्ध झाले.  ‘नफरत के नाम पे, और कितने इन्सान मारोगे’, असा सवाल केंद्र सरकारला करण्यात आला. स्टेशन चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याला साक्षी ठेवून मानवी साखळी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दलित-मुस्लिम अशा दुर्बल घटकांवर होत असलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर  कायदा करावा, अशी मागणीही करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांनी  केलेल्या झुंडशाहीत देशातील सुमारे ३० हून अधिक निष्पांपाची हत्या झाली आहे. दलित आणि मुस्लिम रूढी परंपरेने कातडी कमावण्याचा व्यवसाय करीत आहेत. ते त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. मात्र गोरक्षक या समाजातील लोकांना लक्ष्य करीत आहेत. शेतकऱ्यांनाही आता जनावरे विक्री करणे मुश्‍कील झाले आहे.  गोरक्षेच्या नावाने समाजात फूट पाडली जात आहे. द्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात आहे. त्याविरोधात सामूहिक हुंकार म्हणून आजची मानवी साखळी करण्यात आली. जिल्हा सुधार समितीचे मुनीर मुल्ला यांनी पुढाकार घेऊन आंदोलनाची हाक दिली होती. 

माजी आमदार शरद पाटील, ॲड. के. डी. शिंदे, कॉम्रेड धनाजी गुरव, प्रा. बाबूराव गुरव, नामदेवराव करगणे, भानुदास पाटील, साजिद मुजावर, मीना शेषू, शिवाजीराव ओऊळकर, विनोद मोरे, राजन पिराळे, संतोष पाटील, शाहीन शेख, असीफ इनामदार, साजिद पाटील, सुनीता मदने, मुनीर मुल्ला, प्रवीण कोकरे, हिंमतराव देशमुख, ज्योती आदाटे आदींनी आंदोलनात भाग घेतला. माजी आमदार पाटील म्हणाले, ‘‘दिवस कठीण आहेत. समाजात दुही माजवून मताचे ध्रुवीकरण केले जात आहे. मात्र त्याबद्दल समाजात पुरेशी जागृती नाही. आपण आज प्रातिनिधिक आंदोलन केले. त्याचा संदेश समाजापर्यंत जाईल. मात्र आपल्याला आता तळागाळापर्यंत जाऊन आपली भूमिका समजून सांगितली पाहिजे. आजचे आंदोलन त्याची सुरुवात ठरावी.’’

Web Title: sangli news muslim