क्रांतिसिंहांच्या पुतळ्याची देवराष्ट्रेत उपेक्षाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

देवराष्ट्रे - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जुन्या सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करून ज्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, त्या क्रांतिसिंहांचा येथे पुतळा उभारून ३१ वर्षे झाली; पण कोणतीे सुशोभीकरण केले गेले नाही. सागरेश्वर देवालय व अभयारण्य पर्यटनस्थळ असल्याने भाविक, पर्यटकांची संख्या मोठा असते. पुतळ्याची अवस्था पाहून पर्यटकात नाराजी व्यक्त  होत आहे. पुतळ्याचे तातडीने सुशोभीकरण करावे, अशी मागणी पर्यटक व क्रांतिसिंह प्रेमींतून होत आहे. देवराष्ट्रेचे ग्रामदैवत सागरेश्वर आहे. क्रांतिसिंहांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण ग्रामपंचायतीने करावे, अशीही मागणी होत आहे.

देवराष्ट्रे - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जुन्या सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करून ज्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, त्या क्रांतिसिंहांचा येथे पुतळा उभारून ३१ वर्षे झाली; पण कोणतीे सुशोभीकरण केले गेले नाही. सागरेश्वर देवालय व अभयारण्य पर्यटनस्थळ असल्याने भाविक, पर्यटकांची संख्या मोठा असते. पुतळ्याची अवस्था पाहून पर्यटकात नाराजी व्यक्त  होत आहे. पुतळ्याचे तातडीने सुशोभीकरण करावे, अशी मागणी पर्यटक व क्रांतिसिंह प्रेमींतून होत आहे. देवराष्ट्रेचे ग्रामदैवत सागरेश्वर आहे. क्रांतिसिंहांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण ग्रामपंचायतीने करावे, अशीही मागणी होत आहे. इंग्रजांचा कर्दनकाळ बनलेल्या क्रांतिसिंहांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण कधी होणार ?  असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे देवराष्ट्रे गाव. ते क्रांतिसिंहांची कर्मभूमी. क्रांतिसिंह नाना पाटील सागरेश्वरच्या खिंडीत राहून इंग्रजांशी गनिमी काव्याने लढत होते. देवराष्ट्रेची यात्रा श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी भरते. येथे कुस्ती मैदान होते. यानिमित्ताने परिसरासह जिल्ह्यातील अनेक गावांतील लोक येथे येतात. क्रांतिसिंह येथे भाषण करीत. लोकांना जागृत करीत. इंग्रजांना खबर लागली असता क्रांतिसिंहाना पकडण्यासाठी डाव रचला. मात्र लोकांनी क्रांतिसिंहांना सुखरूप बाहेर काढले. इंग्रजाचा डाव हाणून पाडला. क्रांतिसिंहाची कर्मभूमी असलेल्या गावात क्रांतिसिंहाचे सहकारी भडंग महाराज यांनी ग्रामदैवत सागरेश्वर देवालय येथे ३१ ऑगस्ट १९८६ रोजी प्रती सरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा उभारला. तोच हा पुतळा सध्या मात्र दुर्लक्षित आहे. 

ना पुढाकार, ना आवाज
सामाजिक कार्यकत्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याचा आंदोलनावेळी उपयोग केला. पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी काहीच प्रयत्न केला नाही. आवाज उठवला नाही की, पुढाकार घेतला नाही.

पण लक्षात कोण घेतो...
कडेगाव तालुक्‍यात दोन आमदार आहेत. मोहनराव कदम व त्यांचे बंधू पतंगराव कदम. जिल्हा परिषदेचे अध्यक्षही कडेगाव तालुक्‍याचे संग्राम देशमुख. जिल्हा क्रांतिसिंहांची जन्म व कर्मभूमी. मात्र लक्षात कोण घेतो अशी स्थिती आहे. लक्ष द्यायचा अवकाश, प्रश्न मार्गी लागलाच म्हणून समजा. पण ते होत नाही हेच दुःख आहे.

Web Title: sangli news nana patil