शुभेच्छा त्याही ऐतिहासिक ‘मोडी’तून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

दिवाळीत भेटकार्ड देऊन शुभेच्छा देणं ‘कॉमन’ बाब आहे. टेक्‍नोसॅव्ही युगात तर सोशल साइटच्या भिंतीच शुभेच्छांनी रंगतात. मराठी, हिंदी, इंग्रजीचा वापर त्यात असतो. मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात ऐतिहासिक मोडी भाषेचे प्रशिक्षण, प्रचार, प्रसार असा उपक्रम  राबवला जातो. त्या अंतर्गत यंदा विद्यार्थिनी मोडी लिपीचा वापर करून दिवाळीत शुभेच्छापत्रे पाठवणार आहेत. आज (बुधवारी) जागतिक कन्या दिनानिमित्त त्याची माहिती...  

मोडी लिपीच्या संवर्धनासाठी अभ्यासकांचे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. सामान्यांत या भाषेबद्दल कुतूहल वाढावे, त्यांनी या भाषेचा वैयक्तिक पातळीवर वापर करावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बाजारगप्पा मारण्यापेक्षा लिपीचा प्रचार, प्रसार कृतीतून करण्यासाठी मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आहे. यंदाच्या दिवाळीतील शुभेच्छा पत्र मोडी लिपीत तयार केलीत. त्याचा अर्थही सोबत लिहिण्यात आला आहे. असा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच होत आहे. 

काळाच्या उदरात दडलेल्या इतिहासाची बहुसंख्य लिखीत साधने ही मोडीत आहेत. हा ऐतिहासिक ठेवा वाचला  गेला तरच उमगणे शक्‍य आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नवे मोडी वाचक तयार करणे, आहेत ते वाढवणे,  अभ्यास व संशोधकवृत्ती जोपासण्यासाठी चार वर्षांपासून मोडी शिकवली जाते. इतिहास अभ्यासक मानसिंग कुमठेकर मोडीचा प्रचार, प्रसारासाठी कार्यरत आहेत. त्यांनीच विद्यार्थिनींना ही भाषा शिकवली आहे. प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. उर्मिला क्षीरसागर यांनीही पुढाकार घेतला आहे. 

६८ विद्यार्थिनींनी ही मोडी भाषा शिकण्यासाठी सकारात्मकता दाखवली. यंदा मोडी भाषेत शुभेच्छा पत्रे लिहिण्याची स्पर्धा झाली. ५४ शुभेच्छा पत्रे तयार  करण्यात आली. पत्रात मराठीत अर्थही लिहिण्यात आला आहे. मोडी संवर्धन, प्रचार, प्रसारासाठी राबवलेला हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.  

Web Title: Sangli News National Girl Child Day special