इंधन दरवाढीविरोधात इस्लामपूरात राष्ट्रवादीचा मोर्चा

इंधन दरवाढीविरोधात इस्लामपूरात राष्ट्रवादीचा मोर्चा

इस्लामपूर - सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केले. युवकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने युवकांचा एल्गार मोर्चा काढला. प्रा शामराव पाटील, विनायकराव पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, संग्राम पाटील, छाया पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, रोझा किणीकर प्रमुख उपस्थित होते. या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय यासह निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मोटारसायकल अंत्ययात्रा व बैलगाडी घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार नागेश पाटील यांना निवेदन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यासाठी आणलेली सायकल त्यांच्याकडे सुपुर्द केली. 

तालुकाध्यक्ष विजय पाटील म्हणाले, "सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात यापुढील काळात संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी युवकांनी सज्ज राहावे."

शहाजी पाटील म्हणाले, "सरकारला समान्यांशी देणेघेणे नाही. युवकांनी सरकारला खाली खेचावे. भाजपची पिलावळ इस्लामपुरात घरपट्टी करातून पिळवणूक करत आहे."

खंडेराव जाधव म्हणाले, "आपण आक्रमक होऊन शेतकरी आणि युवकांनी या सरकारला त्यांची जागा दाखवून देऊया."

संग्रामसिंह पाटील म्हणाले, "येत्या वर्षात हे सरकार खाली खेचण्यासाठी संघर्ष करूयात. आमदार जयंत पाटील यांना ताकद देऊ."

उपनगराध्यक्ष दादासो पाटील, जुबेर खाटीक, सुश्मिता जाधव आदींची भाषणे झाली. विश्वासराव पाटील, बाळासाहेब पाटील, विशाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

जयंतराव मार्गदर्शकाच्या भूमिकेत !
पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने आज इस्लामपुरात काढलेल्या एल्गार मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी मोर्च्यांचे नेतृत्व न करता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. कार्यकर्त्यांनी आग्रह करूनही पुढे न येता 'तुम्ही कसं करताय ते पाहायला आलोय' असे सांगत ते बाजूलाच राहिले. 'साहेबांच्या' या भूमिकेची मोर्चास्थळी चांगलीच चर्चा होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com