कमलाकर पाटील यांनी मांडला राष्ट्रवादीतील वाद प्रदेशाध्यक्ष तटकरेंसमोर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

सांगली - शहर जिल्हा राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या गटाने कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री उशीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर संजय बजाज यांच्याबद्दल गाऱ्हाणे मांडले. लवकर निर्णय झाला नाही, तर हा गट पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे.

सांगली - शहर जिल्हा राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या गटाने कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री उशीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर संजय बजाज यांच्याबद्दल गाऱ्हाणे मांडले. लवकर निर्णय झाला नाही, तर हा गट पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे.

हल्लाबोल यात्रेनिमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगलीत आले आहेत. सांगलीतील सभेपूर्वीच काल रात्री महापालिका क्षेत्रातील नगरसेवक, पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष तटकरेंची भेट घेतली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी प्रदेशाध्यक्षांना लेखी पत्र दिले होते. गेल्या महिन्यात शहर कार्यकारिणी निवडीवेळी आमदार जयंत पाटील यांच्यासमोर कमलाकर पाटील, संजय बजाज यांच्या गटातील वाद उफाळून आला होता. त्यावेळी आमदार पाटील यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा वाद प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात ढकलला. दोनच दिवसांनी नाराज नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना पत्र पाठवून बजाज यांच्याविरोधातील नाराजी मांडली.

आता हल्लाबोल यात्रेनिमित्ताने तटकरे, पवार यांच्यासमोर वाद रंगण्याची चिन्हे आहेत. कमलाकर पाटील गट आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे. मात्र बजाज यांच्या नेतृत्वाला विरोध आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक बजाज यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास ते तयार नाहीत. बजाज यांना शहर जिल्हाध्यक्ष पदावरून हटवावे, अशी त्यांची मागणी आहे, तशी मागणी प्रदेशाध्यक्षांना भेटून त्यांनी केली. पक्षाने बजाज यांच्याबाबत निर्णय घेतला नाही. तर लवकरच ते स्वतंत्र चूल मांडण्याच्या तयारीचा निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Sangli News NCP Internal debate Issue