एक बुथ दहा यूथ राष्ट्रवादीचा सांगलीत उपक्रम

बलराज पवार
रविवार, 20 मे 2018

सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या युवक आघाडीने एक बुथ दहा यूथ ही संकल्पना राबवण्याची सूचना केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ही संकल्पना राबवण्यासाठी मंगळवारी (ता. 22) युवक राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला आहे. युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत युवक राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन एक बुथ दहा यूथ ही संकल्पना मांडली होती. प्रत्येक बुथला युवक राष्ट्रवादीचे दहा यूथ
कार्यकर्ते नेमण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार संपुर्ण
राज्यात सुमारे 19 लाख युवकांची फळी बांधण्यात येत आहे. जिल्ह्यातही ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा येत्या मंगळवारी घेण्यात येणार आहे.

- भरत देशमुख, जिल्हाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी

सांगलीवाडी टोलनाक्‍याजवळ मोहिते मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता हा मेळावा होणार आहे. यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात एक बुथ दहा यूथची संकल्पना पदाधिकाऱ्यांना सांगण्यात येईल. त्यानुसार जिल्ह्यात युवकांची फळी
बांधण्याचे काम करण्यात येणार आहे, असे श्री. देशमुख म्हणाले.

Web Title: Sangli News NCP Youth Mela