आष्ट्याच्या विकासात अडचणी आणू नका - निशिकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

आष्टा - वीस वर्षापासून आष्टा शहर व परिसर विकासापासून वंचित ठेवला. रास्त मागणी असूनही ती पूर्ण करण्यात ज्यांची अडचणी आणल्या त्यांनी यापुढील काळात आष्ट्याच्या विकासात अडचणी आणू नयेत असा अप्रत्यक्ष टोला आमदार जयंत पाटील यांना इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत नाव न घेता लगावला.

आष्टा - वीस वर्षापासून आष्टा शहर व परिसर विकासापासून वंचित ठेवला. रास्त मागणी असूनही ती पूर्ण करण्यात ज्यांची अडचणी आणल्या त्यांनी यापुढील काळात आष्ट्याच्या विकासात अडचणी आणू नयेत असा अप्रत्यक्ष टोला आमदार जयंत पाटील यांना इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत नाव न घेता लगावला.

निशिकांत पाटील म्हणाले, "" काही नेत्यांनी आष्टा शहराच्या विकासाला कामयम खीळ घातली आहे. मात्र भाजप आष्टा शहराच्या विकासाला कधीही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच येथील अप्पर तहसील कार्यालय 15 दिवसात सुरु करु, ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन सोहळा होईल.

वैभव शिंदे यांचा नागरी सत्कार होईल. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कामकाजाचा प्रारंभ करण्यात येईल.

यावेळी कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी निधीची मागणी करणार आहोत. मिनी औद्योगिक वसाहत, भुयारी गटार योजना, घनकचरा प्रकल्प, उपनगरांचा वाढता विस्तार लक्षात घेता वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करुन मंजुर करण्याचीही मागणी करणार आहोत. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आष्टा पालिकेने विविध योजना राबवल्या आहेत. राज्यात घरकूल योजना पथदर्शी प्रकल्प ठरली आहे. शहराच्या विकासासाठी विशेष बाब म्हणून दहा कोटीच्या निधीची मागणी करणार आहोत. 25 वर्षे विरोधकांनी शहरासाठी अडचणीच निर्माण केल्या. आम्ही विकासासाठी कटीबध्द आहोत.''

यावेळी शिगावचे उपसरपंच जितेंद्र पाटील, भाजपा युवा मोर्चाचे संकेत पाटील, प्रविण माने, दीपक थोटे, चंद्रकांत पाटील, नंदकुमार बसुगडे उपस्थित होते.

गावांशी चर्चा करू
आष्टा कार्यालयाअंतर्गत जी गावे येणार आहेत. त्यांचा विकास होणार आहे. हा शासन निर्णय असून ज्या गावांची अडचण होते त्यांच्याशी समन्वयातून, चर्चा करुन मार्ग काढू अशी माहिती वैभव शिंदे यांनी दिली. 

Web Title: Sangli News NIshikant Patil comment