रेशन दुकानदारांना परवाना रद्दच्या नोटिसा 

संतोष भिसे
सोमवार, 26 मार्च 2018

मिरज - जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना परवाने रद्द का करु नयेत अशा नोटीसा जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदारांनी दिल्या आहेत. दुकानदार संघटनेने मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. संप मोडीत काढण्यासाठी नोटिसा दिल्याचा आरोप संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंत अग्रवाल यांनी केला. 

दरम्यान, संपासंदर्भात सोमवारी अधिवेशनात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी संघटनेला दिली. राज्यभरातील रेशनिंग व्यावसायिक काही महिन्यांपासून विविध मार्गांनी आंदोलने करीत आहेत. कमिशनवाढीसह विविध मागण्यांसाठी मोर्चे, उपोषणे करीत आहेत. एप्रिलचे धान्य उचलणार नाही, असा इशारा दिला आहे.

पैसेही भरलेले नाहीत. कार्याध्यक्ष वसंत अग्रवाल यांनी सांगितले, की संप मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून परवाने रद्दच्या नोटिसा बजावल्यात. दुकानदारांनी धान्य न उचलल्यास रेल्वेच्या वॅगन थांबून राहतील. त्याचा लाखोंचा दंड शासनाला भरावा लागेल. शासनाने त्रास दिल्यास दुकानदार रस्त्यावर येऊन उग्र आंदोलने करेल. आंदोलनाचा एक भाग म्हणून दुकानदारांनी मिरजेत उपोषणाचा निर्णय घेतला.

खासदार संजय पाटील यांना आंदोलनाची माहिती दिली. सेवा संस्थांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यांनीही संपाला पाठींबा जाहीर केला. अग्रवाल यांच्यासह तालुकाध्यक्ष दीपक उपाध्ये, बाजार समितीचे अध्यक्ष दिनकर पाटील, वसंतराव गायकवाड, महंमद सतारमेकर, राजू आरगे, आरग सोसायटीचे अध्यक्ष सूरज पाटील, भानुदास कोकरे, सदाशिव वाघमारे, राजू कोरे, गोपाळ शिंदे, फैज फौलाद, प्रशांत गंगधर, सूर्यकांत नागरगोजे आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli news Notice of cancellation of license to ration shops