‘कृष्णे’तून गेला एकजण वाहून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

तुंग - कसबे डिग्रज - मौजे डिग्रज बंधाऱ्यावर पार्टी केल्यानंतर पैज लावून कृष्णा नदीत उड्या मारण्याचा खेळ तिघा मित्रांच्या अंगलट आला. यामध्ये वैभव पांढरे (वय ३५, रा. कसबे डिग्रज) हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; तर किशोर पांढरे (३१) व राजू पांढरे (२५, दोघेही रा. कसबे डिग्रज) या दोघांना वाचवण्यात यश आले. बुधवारी दुपारी ही घटना घडली.

कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील हरिजन वसाहतीमधील तीन मित्रांनी कृष्णा नदीवरील डिग्रज बंधाऱ्यावर पार्टीचा बेत आखला होता. जेवणानंतर दारूच्या नशेत बंधाऱ्यावरून उडी मारण्याची तिघांत पैज लागली. 

यामध्ये तिघांनीही उड्या मारल्या. पाऊस असल्याने बंधाऱ्यात भरपूर पाणी व वेग होता. अंदाज न आल्याने वैभव पांढरे वाहून गेला. बाकीच्या दोघांनी भीतीने आरडाओरडा सुरू केला. नदीकाठावरील लोकांनी धाव घेत मदत करत किशोर आणि राजू पांढरे यांना बाहेर काढले. वैभव मात्र पाण्यात दिसेनासा झाला. लोकांनी शोधाशोध केली. पण अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. वैभव पांढरे ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पांढरे याचे पती आहेत. 
बातमी समजल्यानंतर बंधाऱ्यावर गर्दी झाली होती. रात्री उशीरापर्यत शोधमोहिम सुरू होती. घटनास्थळाची सांगली ग्रामीण पोलिसांनी पाहाणी केली.

Web Title: Sangli News one dead in Krishna River