संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

संतोष कणसे
गुरुवार, 10 मे 2018

कडेगाव - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिह देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पलूस -कडेगाव मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांचेकडे हे अर्ज देण्यात आले.

खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अजितराव घोरपडे, भगवानराव साळुंखे, गोपीचंद पडळकर, अतुल भोसले, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, डी. के. पाटील, पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे, जि. प. सदस्य रेश्मा साळुंखे, शांता कनुंजे, पंचायत समिती सदस्य आशिष घार्गे, मंगल क्षीरसागर, भाजपचे तालुकाध्यक्ष हिंमतराव देशमुख, विजय पाटील, प्रतापराव यादव, दत्तूशेठ सूर्यवंशी, विक्रम पाटील, वैभव शिंदे, चंद्रसेन देशमुख, आर. एम. पाटील आदी उपस्थित होते.

राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्या अकाली निधनानंतर पलूस -कडेगाव मतदार संघात पोटनिवडणूक होत असून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांनी यापूर्वी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर येथे भाजपने पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपच्यावतीने संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांनी आज अर्ज दाखल केला. तसेच पृथ्वीराज देशमुख व राजाराम गरूड यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता येथे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. .

Web Title: Sangli News Palus - Kadegaon By election