शिवसेनेचा विश्‍वजीत कदमांना पाठींबा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

सांगली - पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसचे उमेदवार विश्‍वजीत कदम यांना पाठींबा जाहीर केला आहे. या मतदार संघातून भाजपने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने ही भूमिका जाहीर करत भाजपला चुचकारले आहे. 

सांगली - पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसचे उमेदवार विश्‍वजीत कदम यांना पाठींबा जाहीर केला आहे. या मतदार संघातून भाजपने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने ही भूमिका जाहीर करत भाजपला चुचकारले आहे. 

सेना नेते खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पत्राव्दारे दुपारी पाठींबा जाहीर केला. त्यात म्हटले आहे, की पतंगराव कदम हे सहकार, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कर्तबगार व दिलखुलास व्यक्तीमत्व होते. राजकारण आणि सहकारात त्यांची भूमिका पक्षाच्या पलीकडची होती. हे सर्व पाहता पतंगरावांना श्रद्धांजली म्हणून पलूस-कडेगावची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी शिवसेनेची इच्छा होती. तसे दुर्दैवाने होताना दिसत नाही. विश्‍वजीत कदम यांना संपूर्ण सक्रिय पाठींबा आम्ही देत आहोत.'' 

पलूस-कडेगाव मतदार संघात पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. तेथे कॉंग्रेसकडून विश्‍वजीत मैदानात उतरले असून काल भाजपने ही निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली, त्यांनी आज अर्जही दाखल केला. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने कॉंग्रेस उमेदवाराला पाठींबा जाहीर करून भाजपविरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

या मतदार संघात शिवसेनेची ताकद फार मोठी नाही, मात्र तरीही शिवसेना केवळ बाहेरून पाठींबा देणार नसून ती सक्रियपणे विश्‍वजीत यांच्या प्रचारात उतरणार आहे. ही निवडणूक लागणे दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून सेनेने भाजपच्या भूमिकेवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, युवा सेनेचे पृथ्वीराज पवार, संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, नगरसेवक शेखर माने आदींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विश्‍वजीत यांच्या प्रचारात शिवसेना सक्रिय सहभागी होऊ, असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. 

Web Title: Sangli News Palus - Kadegaon By Election