पलूसचे नायब तहसीलदार मोरे निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

सांगली - पलूसचे नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर पलूस-कडेगाव विधानसभेच्या पोटनिवडणूक कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तहसीलदार डॉ. विजय देशमुख यांनी ही कारवाई केली. 

या पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यात मोरे यांच्याकडे वाहतूक आराखडा तयार करणे, बसची व्यवस्था, खासगी वाहने अधिग्रहित करणे, निवडणुकीसाठी लागणारे ईव्हीएम मशिनचे तांत्रिक काम पूर्ण करणे, अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. त्याबाबत त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या; मात्र ते काम त्यांनी केले नाही.

याबाबत चौकशीसाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही. या कामासाठी कार्यालयात हजरही राहिले नाहीत, असा ठपका कारवाईच्या आदेशात ठेवण्यात आला आहे. ते, ५ मे २०१८ पासून अनधिकृतपणे कामावर गैरहजर असल्याचेही त्यात नमूद केले आहे. 

Web Title: Sangli News Palus tahsildar More suspended