सांगली महापालिकेत राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय चर्चेनंतर - पतंगराव कदम

संतोष कणसे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

कडेगाव - जिल्हा स्तरावर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी शक्‍य आहे. सांगली महापालिकेत मात्र आमची सत्ता असल्याने राष्ट्रवादीसोबत आघाडी करावयाची की काय ? याबाबत सर्व नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे प्रतिपादन आमदार पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

कडेगाव - जिल्हा स्तरावर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी शक्‍य आहे. सांगली महापालिकेत मात्र आमची सत्ता असल्याने राष्ट्रवादीसोबत आघाडी करावयाची की काय ? याबाबत सर्व नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे प्रतिपादन आमदार पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

ते म्हणाले, केंद्र व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडीबाबतचा निर्णय योग्यवेळी होईल. काँग्रेस दिल्लीपासून ग्रामीण भागात तळागाळात रुजलेला पक्ष आहे. पक्षाने अनेक चढ उतार पाहिलेत. लोकसभा, विधानसभेवेळी मोदी लाट होती. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या "अच्छे दिन' चा लोकांना चांगलाच अनुभव आला. कर्जमाफी, नोटबंदी असो की, जीएसटी केंद्र, राज्याच्या प्रत्येक निर्णयाला लोक वैतागलेत. ज्यांची नावे कर्जमाफी यादीतच नाहीत, त्यांना भाजप नेत्यांनी कर्जमाफी प्रमाणपत्रे वितरित केली. ही कर्जमाफी फसवी आहे.'' 

ते म्हणाले,""जाचक निकष लावल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. करांच्या बोजाखाली देश, राज्यातील नागरिक, व्यापारी व लघुद्योजक अक्षरश: दबलेत. भाजप सरकारचा कारभार लोकांनी चांगलीच अनुभवला. पूर्वीचे दिवस चांगले होते अशी भावना झाली आहे.'' 

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आली. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना शासनाने जादा अधिकार दिलेत. गावांतील कामांसाठी थेट ग्रामपंचायतीकडे निधी येणार आहे. सरपंचांना विकासात्मक कामांची संधी आहे. तेंव्हा नवनिर्वाचित सरपंचांना कामकाजाची माहिती मिळावी यासाठी लवकरच कार्यशाळा घेतली जाणार आहे.'' 

ते म्हणाले,""साखर कारखान्यांचा हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. गतवेळी हंगामात "सोनहिरा'ने शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर दिला. येत्या हंगामातही सोनहिरा ऊस दरात राज्यात अग्रेसर राहील.'' 

डेंग्यूबाबत उपाययोजना 
कडेगावात डेंग्यूचे 4 रुग्ण आढळलेत. तातडीने उपाययोजनांचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना दिल्याचेही आमदार श्री. कदम यांनी सांगितले.

Web Title: Sangli News Patangrao Kadam Press