शहरात पोलिसांचे सशस्त्र संचलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सांगली - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहर, नांद्रे गावात पोलिसांनी संचलन केले. उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन झाले. चार पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, दोन स्ट्रायकिंग फोर्स सहभागी झाले. उत्सवात सुरक्षेसाठी आम्ही सज्ज असल्याचा संदेश पोलिसांनी संचलनातून दिला. 

शहर पोलिस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक, पंचमुखी मारुती रोड, हिराबाग वॉटर वर्क्‍सपर्यंत संचलन झाले. त्यानंतर पटेल चौकातून कर्नाळ चौकी, गवळी गल्ली, गणपती पेठ, टिळक चौकातून सरकारी घाटापर्यंत संचलन करण्यात आले. 

शहर विभागाच्या उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यासह शहर पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, ग्रामीण पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे, संजयनगरचे पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल निकम, सहायक पोलिस निरीक्षक संगीता माने तसेच उपनिरीक्षक युवराज कामटे, बाळासाहेब माळी, रोहित चौधरी यांच्यासह चार पोलिस ठाण्यांचे 142 कर्मचारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी संचलनात सहभागी झाले. 

उत्सव शांततेत पार पाडा, नागरिकांशी सौजन्याने वागा, कर्तव्य प्रामाणिक पार पाडा, अशा सूचना उपाधीक्षक डॉ. काळे यांनी दिल्या. 

पोलिस व्हॅन घसरते तेव्हा  
पोलिसांचे संचलन सुरू असताना स्टेशन चौकात पावसाने झालेल्या चिखलात पोलिस व्हॅन घसरली. ही व्हॅन घसरत जाऊन रस्त्याच्या कडेला फूटपाथपर्यंत गेली.

Web Title: sangli news police