पोलिसाच्या खून प्रकरणी हाॅटेल रत्नाच्या मालक, व्यवस्थापकास अटक    

बलराज पवार
रविवार, 22 जुलै 2018

सांगली -  मिरज शहर पोलीस ठाण्याकडील पोलिस कर्मचारी समाधान मांटे यांच्या खून प्रकरणी हाॅटेल रत्ना डिलक्सचा मालक कुमार कुमसगे आणि व्यवस्थापक शब्बीर नदाफ यांना पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या सहा झाली आहे.

संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुपवाड रोडवरील हॉटेल रत्ना डिलक्स येथे गेल्या मंगळवारी रात्री खुनाचा थरार घडला होता.  हॉटेलच्या सिसिटीव्ही कॅमेरात हा प्रकार कैद झाली आहे. यामध्ये दोन हल्लेखोर असल्याचे दिसून आले आहे. 

मांटे रात्री ड्युटी संपवून घरी येताना हॉटेल रत्नामध्ये दारू पिण्यास गेले होते. तेथे त्यांचा  झाकीर जमादार यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतर ते हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारातच बोलत थांबले असताना जमादार धारदार हत्यार घेऊन आला आणि त्याने मांटे यांच्यावर सपासप वार करून त्यांचा खून केला.                       

मांटे यांच्या खुनाची घटना हॉटेलच्या 'सिसिटीव्ही' कॅमेर्‍यात रेकाॅर्ड झाली आहे. त्यावरून पोलिसांनी जमादार, त्याचा मेहूणा वसीम शेख यांच्यासह चौघांना अटक केली होती.

दरम्यान या प्रकरणी हाॅटेलच्या आवारात पडलेला मांटे यांचा मृतदेह बाहेर फुटपाथवर आणून ठेवून आवारातील रक्त धुवून टाकले होते. हा प्रकार उघड झाल्यावर पोलिसांनी हाॅटेल मालक कुमार कुमसगे आणि त्याचा मॅनेजर शब्बीर पठाण यांना काल रात्री उशिरा अटक केली. त्यांच्यावर कलम २०१ व २१२ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात जमादारने वापरलेली गाडी आणि सत्तूरसारखे हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.

संबंधीत बातम्या - 

हॉटेल आवारातील मृतदेह गेटबाहेर कुणी आणला? 

Web Title: Sangli News Police Murder case