सांगलीत रत्ना डिलक्‍सला ठोकले "सील'  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सांगली - येथील कुपवाड रस्त्यावरील रत्ना डिलक्‍स हॉटेलमध्ये वाहतूक शाखेचा पोलिस समाधान मांटे (वय 29) यांचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज सकाळी महापालिका प्रशासनाने हॉटेला सील ठोकले.

सांगली - येथील कुपवाड रस्त्यावरील रत्ना डिलक्‍स हॉटेलमध्ये वाहतूक शाखेचा पोलिस समाधान मांटे (वय 29) यांचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज सकाळी महापालिका प्रशासनाने हॉटेला सील ठोकले. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हॉटेलमालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. 

समाधान मांटे मंगळवारी रात्री घरी येत होते. पोलिसाच्या गणवेशातच ते हॉटेलमध्ये आले होते. काऊंटरवर उभे असताना संशयित झाकीर जमादार (रा. हडको कॉलनी) हा दारू पिऊन बाहेर येत होता. काऊंटरवर त्याचा बिलावरून हॉटेल मॅनेजरशी वाद झाला. त्यावेळी मांटे यांनी त्याला थोबाडीत मारली. झाकीरला त्याचा राग आला. त्याने बाहेर येऊन अतहर शब्बीर नदाफ (वय 28) आणि अन्सार अजिज पठाण (वय 30, दोघेही रा. हडको कॉलनी, लक्ष्मी देवळाजवळ) या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर समाधान मांटे हॉटेल्या गेटजवळ आल्यानंतर झाकीरने चाकूच्या सहाय्याने हल्ला चढवला.

क्षणात सपासप वार केले. यात मांटे जागेवरच जखमी अवस्थेत कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.  

दरम्यान, आज आयुक्तांनी हॉटेल सील करण्याचे आदेश दिले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सकाळी हॉटेलला सील ठोकले. रात्री अकरानंतर मद्यविक्री करत असल्याने हॉटेलमालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.  

Web Title: Sangli News Police Murder case followup