आटपाडी शहरात दुषित पाण्याचा पुरवठा

नागेश गायकवाड
सोमवार, 4 जून 2018

आटपाडी - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठल्यामुळे गाळमिश्रित गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

आटपाडी - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठल्यामुळे गाळमिश्रित गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहराला आटपाडी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या पस्तीस हजारावर आहे. तलावातून पाणी उचलून जवळच्या टाकीत भरले जाते. तेथून शहरातील पाच टाक्या भरतात. तलावाची 301 दशलक्ष घनफूट क्षमता आहे. तर थेट तलावातून साडेतीनशेवर विदयुत पंपाच्या सहयाने शेतीसाठी रात्रदिवस उपसा केला जाते. बेसुमार उपशाकडे प्रशासनाने दुलर्क्ष केल्यामुळे पाण्याने तळ गाठला आहे. गाळमिश्रीत पाणी राहिले असून त्याच पाण्याचा शहराला पुरवठा केला जातो. अशा दुषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामपंचायतीने तहसील कार्यालयाकडे तलावातील बेसुमार पाणी उपसा थांबविण्याची मागणी वीस दिवसांपूर्वी केली होती. यावर महसूल प्रशासनाने कागदपत्रे रंगविली प्रत्यक्षात बेसुमार पाणी उपसा सुरू आहे. शहरावर पाण्याचे संकट महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे ओढावले आहे.    

'जलशुद्धीकरण यंत्रणा नावाला दूषित पाणी गावाला'.

आटपाडी तलावावर जलशुद्धीकरण यंत्रणा उभा केली आहे. मात्र ती पूर्ण क्षमतेने सुरु नाही. या कामात अनेक त्रुटी राहिल्यामुळे याचा वापर केला जात नाही.त्यामुळे 'जलशुद्धीकरण यंत्रणा नावाला दूषित पाणी गावाला', असेच चित्र बनले आहे.

Web Title: Sangli News polluted water distribution in Atapadi