मुंबईत 22 रोजी धनगरी ढोल गर्जना आंदोलन - प्रकाश शेंडगे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

सांगली  - धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचे आश्‍वासन देवून सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे येत्या 22 मे रोजी मंत्रालयावर ऐतिहासिक धनगरी ढोल गर्जना आंदोलन करणार आहे. यामध्ये अकरा हजार ढोल घेऊन धनगर बांधव सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली. 

ते म्हणाले, "" धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची शिफारस केंद्राने मान्य केली आहे. मात्र त्याची जी यादी प्रसिध्द केली त्यामध्ये धनगड असे लिहील्याने गेल्या चार पिढ्या सवलतींपासून लांब राहून उद्ध्वस्त झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनगर समाजाला आरक्षण देवून अच्छे दिन देण्याचा शब्द दिला होता. चार वर्ष झाली तरी अच्छे दिन आले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्षात 225 कॅबिनेटच्या बैठका झाल्या, मात्र एकाही बैठकीत आरक्षणातला "ध'सुध्दा घेतला नाही.'' 

टाटा सोशल सायन्सचा एक अभ्यास गट नेमला आहे. मात्र अशा अभ्यास गटाला घटनात्मक दर्जा नाही. त्यामुळे त्यांचा अहवाल टिकत नाही. अशा अभ्यास गटाला, आयोगाला आमचा विरोध आहे, असे श्री. शेंडगे म्हणाले. मंत्रालयासमोर आंदोलनानंतर सरकारने सवलती लागू केल्या नाहीत तर आंदोलनाची तीव्रता वाढवून गावोगावी आंदोलन करु. 2019 च्या निवडणुकीत सरकारचे पानिपत करु. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, सरदार शेळके, सरपंच रामचंद्र वाघमोडे, बाळू मंगसुळे उपस्थित होते. 

जागतिक विक्रम 
या आंदोलनात अकरा हजार धनगरी ढोल गर्जना करणे हा जागतिक विक्रम असेल. यापुर्वी 1356 ढोलांचा विक्रम आहे. या आंदोलनात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यातील धनगरी ढोल सहभागी होणार आहेत, असे श्रीे. शेंडगे म्हणाले. 

Web Title: Sangli News Prakash Shendage Press