राजू शेट्टी आमदार नाईकांना देणार भाजप सोडण्याचा सल्ला 

अजित झळके
शुक्रवार, 22 जून 2018

सांगली - शिराळ्याचे भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी मला विचारले तर मी त्यांना भाजप सोडा, असा सल्ला देईन, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते. 

आमदार नाईक यांचा राजू शेट्टींशी स्नेह आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात शेट्टींना नेहमीच नाईकांना थेट पाठींबा दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शेट्टींनी भाजपसोबत युती केली होती. त्यानंतर श्री. नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाकडून लढावे, याबाबतही शेट्टींनीच सूचवले होते. त्यानुसार नाईकांचा प्रवेश झाला आणि ते आमदारही झाले. दरम्यानच्या काळात शेट्टींना भाजपशी काडीमोड घेत दोनहात सुरु केले आहेत. नाईक भाजपमध्येच आहेत, मात्र त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यांना भाजप सोडण्याची भाषा केली नसली तरी गेली चार वर्षे मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याने हे ज्येष्ठ आमदार नाराज असल्याचे बोलले जातेय.

त्याबाबत विचारले असता, श्री. शेट्टी म्हणाले, ""भाजपमधून कोण कोण बाहेर पडतोय, याकडे माझे लक्ष आहेच. श्री. नाईक यांनी मला विचारले तर मी आधी सांगेन, भाजप सोडा. कारण तिकडे जावा, असे सांगणारा मीच होतो.'' श्री. नाईक आणि आपले चांगले संबंध आहेत, मी भाजप विरोधी भूमिका घेतली असली तरी आमच्या व्यक्तिगत मैत्रीत दुरावा नाही, असेही श्री. शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Sangli News Raju Shetty advice to Shivajirao Naik