संरक्षण घेऊन फिरायची वेळ आल्यास निवडणूक लढवणे बंद करेन - राजू शेट्टी

शांताराम पाटील 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

इस्लामपुर - मला माझ्या मतदार संघात संरक्षण घेवुन फिरायची वेळ येईल, त्यावेळी मी निवडणुक लढवायची बंद करेन, असा पलटवार खासदार राजु शेट्टी यांनी आज इस्लामपुरात केला. ​

इस्लामपुर - मला माझ्या मतदार संघात संरक्षण घेवुन फिरायची वेळ येईल, त्यावेळी मी निवडणुक लढवायची बंद करेन, असा पलटवार खासदार राजु शेट्टी यांनी आज इस्लामपुरात केला.

मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  इस्लामपुर येथील स्वाभिमानीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यांनंतर आज खासदार शेट्टी यांनी आज कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

सागर खोत यांनी शेट्टी यांचा आजचा ताकारी-  तुपारी येथील कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. यावर शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. शेट्टी म्हणाले, आमचे कार्यकर्ते खंडणी बहाद्दर अथवा भिकारी नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते स्वखर्चाने कार्यालय दुरुस्त करतील. मी जर आज इथे आलो नसतो, तर मी घाबरुन पळुन गेलो, असे काही लोकांना वाटले असते. यासाठीच आज येथे थांबून पुढे जात आहे.

Web Title: Sangli News Raju Shetty comment