सहकारातील चोर भाजपमध्ये पवित्र - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

सांगली - सहकारी संस्थांची लूट करणारे सारे चोर भाजपमध्ये जाऊन पवित्र झाले असतील. मात्र त्यांच्या विरोधातील माझी लढाई सुरूच राहील, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शासकीय विश्रामगृहात जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत बंड यशस्वी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा शेट्टींना मंत्रिपदाची ऑफर दिली. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘आता कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्वरूपात सत्तेत जायचे नाही. देश आणि राज्य पातळीवर शेतकऱ्यांचा प्रचंड दबाव गट बनवायचा आहे.

सांगली - सहकारी संस्थांची लूट करणारे सारे चोर भाजपमध्ये जाऊन पवित्र झाले असतील. मात्र त्यांच्या विरोधातील माझी लढाई सुरूच राहील, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शासकीय विश्रामगृहात जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत बंड यशस्वी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा शेट्टींना मंत्रिपदाची ऑफर दिली. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘आता कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्वरूपात सत्तेत जायचे नाही. देश आणि राज्य पातळीवर शेतकऱ्यांचा प्रचंड दबाव गट बनवायचा आहे. सत्तेत राहून ते होणार नाही. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणे आणि स्वामिनाथन आयोग लागू करणे, हे मुख्य उद्देश आहेत. त्यासाठी रविकांत तुपकर यांचा राजीनामा दिला आहे. सहकार टिकला पाहिजे, यासाठी भांडत राहू. विकलेल्या साखर कारखान्यांविरुद्धची माझी याचिका न्यायालयात आहे. सहकारातील अन्य भ्रष्टाचारी लोक भाजपात जाऊन पवित्र झाले असतील, मात्र आमची लढाई सुरूच राहील.’’

हातकणंगले लोकसभा मतदार संघात पूर्वी राष्ट्रवादी विरोधक होता, आता भाजप मुख्य विरोधक राहील, असे चित्र आहे. त्याविषयी ते म्हणाले,‘‘सन २००९ च्या लोकसभेला मी आघाडी आणि युती दोघांविरुद्ध लढून विजयी झालो. या निवडणुकीत पक्षीय मुद्द्यांपेक्षा प्रश्‍न महत्त्वाचे असतात. कोण माझ्यासोबत असते कोण नाही, हे काळच ठरवेल. मी पूर्वी राष्ट्रवादीवर, शरद पवार यांच्यावर टीका करायचो. त्यांच्या बांधाला माझा बांध नाही, पण ते दीर्घकाळ कृषिमंत्री होते. आमचा लढा शेतकरी हितासाठी आहे. लालू प्रसाद यादव कृषिमंत्री असते तर मी त्यांच्याविरुद्ध बोललो असतो. आता शरद पवार सत्तेत नाहीत, मी उगाच का त्यांच्यावर टीका करीत बसायचे?’’

स्थानिक आघाड्या तूर्त आहेत तशाच
खासदार शेट्टी म्हणाले,‘‘भाजप सरकारचा पाठिंबा काढून आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असलो तरी जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्थिती जैसे थे राहील. किमान पुढच्या निवडींचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत हे चित्र बदलणार नाही. पुढचे पुढे पाहू. ग्रामपंचायत निवडणुकीतही स्थानिक पातळीवर आवश्‍यक तशी भूमिका घ्या, असे मी सांगितले आहे.’’

Web Title: sangli news raju shetty talking