पोलिसांच्या दारात रिक्षावाल्याचा धिंगाणा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

सांगली - येथील शहर पोलिस ठाण्यासमोर एका रिक्षावाल्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहतूक रोखली. रिक्षाला एसटीचा धक्का भसल्याचे निमित्त करून बस चालकास अर्वाच्च शिवीगाळ करत "खाली उतर, तुला दाखवतो', अशी धमकी दिली. दुपारी दीडच्या सुमारास प्रकार घडला. पोलिस यंत्रणा नेमकी कशा पद्धतीने काम करते, याचे उघड दर्शनही सांगलीकरांना घडले. 

सांगली - येथील शहर पोलिस ठाण्यासमोर एका रिक्षावाल्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहतूक रोखली. रिक्षाला एसटीचा धक्का भसल्याचे निमित्त करून बस चालकास अर्वाच्च शिवीगाळ करत "खाली उतर, तुला दाखवतो', अशी धमकी दिली. दुपारी दीडच्या सुमारास प्रकार घडला. पोलिस यंत्रणा नेमकी कशा पद्धतीने काम करते, याचे उघड दर्शनही सांगलीकरांना घडले. 

इस्लामपूर आगाराची एसटी बस (एमएच 12 ईएफ 6395) सांगली स्थानकातून निघून महापालिकेसमोरून कर्नाळ नाक्‍यावरून बायपासकडे जाणार होती. मित्रमंडळ चौकात ईदनिमित्त खरेदीला गर्दी होती. वाहतूक संथ होती. रिक्षा एसटीसमोर होती. रिक्षाने कचकन्‌ ब्रेक मारल्याने एसटीही थबकली. एसटीच्या डाव्या चाकाजवळचा पत्रा नकळत रिक्षाजवळ गेला. रिक्षा बंद करून "लाऊड स्पीकर' सुरु केला. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत चालकास खाली खेचण्यासाठी एसटीच्या दाराला धडका मारल्या. एसटी चालकाने मारहाणीची शक्‍यता लक्षात घेवून एसटीत बसून राहणे प्राधान्य दिले. 

हा प्रकार सुरु असताना तीन वाहतूक नियंत्रक पोलिस चौकातच होते. एकाने पाच मिनिटांनंतर नावापुरती हजेरी लावली. एरवी भांबावलेले चेहरे पाहून "बकरा' सापडला, अशा अविर्भात पुढे धावणारी यंत्रणा रिक्षावाल्यापुढे मूक होती. एसटी चालकाची चूक नाही, हे दिसत असून त्यांनी रिक्षावाल्याला रोखले नाही. या गोंधळात वाहतूक ठप्प झाली, गाड्या अडकून पडल्या. पादचाऱ्यांना हलता येईना. शेवटी नागरिकांनी पुढाकार घेवून रिक्षा हलवली. रिक्षाला काडीमात्र नुकसान झाले नसल्याने लोकांनीच रिक्षावाल्याला दमात घेतले. एसटीवाल्याला हात दाखवत रवाना व्हा, असे सुचवले. 

ह्याला वाहतूक नियंत्रण ऐसे नाव..! 
महापालिका चौकात तीन पोलिस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करत होते. शहर पोलिस ठाण्यातील काही शिपाई भिंतीलगत गप्पा मारत उभे होते. त्यापैकी कुणीही फिरकले नाही. एक वाहतूक नियंत्रक आला, त्याने पाहिले आणि निघून गेला. कुठे? तर म्हणे, वाहतूक नियंत्रणाला. "ट्रॅफिक बघू, का भांडणे सोडवू', असा सवाल त्यांनी नागरिकांना केला. "मी ठाणे अंमलदाराला कळवले आहे, ते येतील', अशी भूमिका घेत त्यांनी हा आपला प्रांतच नसल्याचे सांगून टाकले.

Web Title: sangli news rickshaw driver police station