सांगलीत घर फोडून 4 लाखांचा ऐवज लंपास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

सांगली - येथील रेल्वे स्थानकाजवळील आरवाडे पार्कमधील चोरट्याने घर फोडून 15 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा चार लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी घरमालक मेहमुदा खुदबुद्दिन कोतवाल (वय 60, मयूर कॉलनी) यांनी भाडेकरू संदीप अशोक भोसले (नदीवेस शिरोळ) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

कोतवाल यांचे आरवाडे पार्कमध्ये घर आहे. संशयित भोसले हा काही दिवसांपासून त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. काल दुपारी बारा वाजता कोतवाल कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दुपारी साडेतीन वाजता घराकडे परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. चोरट्याने बेडरूममधील तिजोरीतील सोन्याच्या दोन पाटल्या, नेकलेस, कर्णफुले, डायमंडची कर्णफुले, दोन अंगठ्या, सोनसाखळी, तीन हजार रुपये रोख आणि 11 हजार रुपयांचा मोबाईल असा सुमारे 4 लाखांचा ऐवज लांबवल्याचे दिसले. भरदिवसा चोरी झाल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. 

दरम्यान, कोतवाल यांच्या घरातील भाडेकरू संदीप भोसले हा गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने घराचे कुलूप न तोडता बनावट चावीने दरवाजा उघडून आतील तिजोरीतील दागिने, तसेच रोकड लंपास केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोतवाल यांनी चोरीप्रकरणी भोसले याच्याविरुद्ध संशय व्यक्त केला आहे. त्याच्याविरुद्ध चोरीची फिर्याद दिली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत. 

Web Title: sangli news robbery crime

टॅग्स