वाळवा तालुक्यात चिकुर्डी फाट्यावर चोरीची घटना

विजय पाटील
गुरुवार, 17 मे 2018

सांगली - वाळवा तालुक्यातील कुरळप येथे चिकुर्डी फाट्यावर पाच ते सहा चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून एका महिलेला लुटले आहे. यात महिलेला बांधून घालून बेदम मारहाण करून 5 तोळे सोने लंपास केले आहेत.

सांगली - वाळवा तालुक्यातील कुरळप येथे चिकुर्डी फाट्यावर पाच ते सहा चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून एका महिलेला लुटले आहे. सुशिला कांबळे असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेत महिलेला बांधून घालून बेदम मारहाण करून 5 तोळे सोने लंपास केले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुरळप येथील चिकुर्डी फाट्यावर 10 ते 12 घरे आहेत. रात्री अडीच ते तीनच्या सुमारास पाच ते सहा चोरट्यांनी सुशिला कांबळे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. सुशिला यांना बांधून घालून त्यांना मारहाण केली. तलवारीचा धाक दाखवून  त्यांनी पाच तोळे सोने लूटले. यावेळी संबंधीत महिलेने आरडा ओरडा केली मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. चोरट्यानी शेजाऱ्याच्या घराला बाहेरून कडी लावल्या होत्या. त्यामुळे शेजारीही तिच्या मदतीला येऊ शकले नाहीत. यात सुमारे एक लाख अडतीस हजार रुपयांचा एेवज चोरीस गेला आहे. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. 

Web Title: Sangli News robbery incidence in Walava Taluka